ECIL Recruitment 2021: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये तांत्रिक अधिकारी पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्याअंतर्गत एकूण 650 पदे भरण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज करू इच्छित कोणताही उमेदवार अधिकृत पोर्टल ecil.co.in वर ऑनलाईन अर्ज करू शकतो. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, तांत्रिक अधिकारी पदावर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे जास्तीत जास्त वय 30 वर्षे असणे आवश्यक आहे.
ईसीआयएल 650 पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2021 आहे. यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या व्यतिरिक्त अर्जात काही दोष आढळल्यास अर्ज नाकारला जाईल. (Central Railway Recruitment 2021: अपरेंटिच्या 2500 पदांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज प्रक्रियेबद्दल अधिक)
या तारखा लक्षात ठेवा -
- ईसीआयएल भरतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात - 5 फेब्रुवारी 2021
- ईसीआयएल 2021 भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख - 15 फेब्रुवारी 2021
- ईसीआयएल डीव्ही प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची तारीख - 20 फेब्रुवारी 2021
शैक्षणिक पात्रता-
तांत्रिक अधिकारी पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड इंस्ट्रूमेंटेशन इंजीनियरिंग, मॅकेनिकल इंजीनियरिंगसह इतर संबंधित स्ट्रीममधून एकूण 60% गुणांसह बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे.
दरम्यान, ECIL च्या वतीने घेण्यात येणाऱ्या तांत्रिक अधिकारी पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ईसीआयएल करिअर पोर्टल या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर याठिकाणी आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी आणि ईसीआयएल अर्ज 2021 भरावा. यानंतर ईसीआयएल भरती 2021 ऑनलाईन अर्ज जमा करा. यानंतर ECIL भर्ती अधिसूचना 2021 वर क्लिक करा. यानंतर आपला फॉर्म भरला जाईल. फॉर्म भरल्यानंतर त्याचे प्रिंटआउट घ्या.