Bank Holidays in September 2022: RBI हॉलिडे कॅलेंडरनुसार, सप्टेंबर 2022 मध्ये, बँका 13 दिवस बंद राहतील. सप्टेंबरमध्ये बँकेत जाण्यापूर्वी तुम्ही सुट्ट्यांची यादी तपासली पाहिजे. यातील काही सुट्ट्यांच्या दिवशी केवळ राज्यातील बँका बंद असतील. तर काही सुट्ट्यांच्या दिवशी संपूर्ण देशातील सर्व बँका बंद असतील. ऑगस्ट महिन्यात शनिवार आणि रविवारसह 18 दिवस बँका बंद होत्या.
सप्टेंबर महिन्यात बँकांच्या शाखा बंद असल्या तरी या काळात तुम्ही तुमचे बँकिंग संबंधित काम ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करू शकता. ऑनलाइन बँकिंग सेवा सर्व दिवस उपलब्ध असेल. (हेही वाचा - Order Food on Trains: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता तुम्ही ट्रेनमध्येही WhatsApp वरून मागवू शकता तुमच्या आवडीचे पदार्थ; 'अशी' करा ऑर्डर)
विविध राज्यांसह 13 सुट्ट्या -
सप्टेंबरमध्ये विविध ठिकाणी एकूण 13 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्याच वेळी, सप्टेंबरमध्ये संपूर्ण देशात 6 दिवस बँका बंद आहेत. चेक क्लिअरन्स, कर्ज, डिमांड ड्राफ्ट यासारख्या सेवांसाठी शाखेला भेट द्यावी लागते. त्यामुळे आपले बँकेतील काम रखडून नये यासाठी सप्टेंबरमध्ये बँकांना किती व कोणत्या दिवशी सुट्टी आहे, हे माहित असणं आवश्यक आहे. चला तर मग सप्टेंबर महिन्यातील बँकेच्या सुट्ट्यांची यादी जाणून घेऊयात...
देशभरातील बँका 6 दिवस राहणार बंद -
- 4 सप्टेंबर रोजी पहिला रविवार
- 10 सप्टेंबर रोजी दुसरा शनिवार
- 11 सप्टेंबर रोजी दुसरा रविवार
- 28 सप्टेंबर रोजी तिसरा रविवार
- 24 सप्टेंबर रोजी चौथा शनिवार
- 25 सप्टेंबर रोजी चौथा रविवार
सप्टेंबर 2022 मधील बँक सुट्ट्या -
1 सप्टेंबर 2022 - गणेश चतुर्थी
4 सप्टेंबर 2022 - रविवार (साप्ताहिक सुट्टी)
6 सप्टेंबर 2022 - कर्मा पूजा - रांचीमध्ये बँका बंद
7 सप्टेंबर 2022 - पहिला ओणम - कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद
8 सप्टेंबर 2022 - तिरुओनम - कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद
9 सप्टेंबर 2022 - इंद्रजात्रा - गंगटोकमध्ये बँक बंद
10 सप्टेंबर 2022 - शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार)
11 सप्टेंबर 2022 - रविवार (साप्ताहिक सुट्टी)
18 सप्टेंबर 2022 - रविवार (साप्ताहिक सुट्टी)
21 सप्टेंबर 2022 - श्री नारायण गुरु समाधी दिन - कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद
24 सप्टेंबर 2022 - शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)
25 सप्टेंबर 2022 - रविवार (साप्ताहिक सुट्टी)
26 सप्टेंबर 2022 - जयपूर आणि इम्फाळमध्ये नवरात्रीच्या घटस्थापनेनिमित्त बँकेला सुट्टी असेल.
दरम्यान, या महिन्यातील बँक सुट्ट्यांबद्दल बोलायचं झालं तर, ऑगस्ट महिन्यात अनेक सुट्ट्या शिल्लक आहेत. 27 ऑगस्टला चौथा शनिवार असून 28 ऑगस्टला रविवार आहे. त्यामुळे या दिवशी बँका बंद राहतील. याशिवाय 29 ऑगस्ट ही श्रीमंत शंकरदेव यांची तिथी आहे. त्यामुळे गुवाहाटीमध्ये या दिवशी बँका बंद राहतील. गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये महिन्याच्या शेवटच्या दिवशी 31 ऑगस्ट रोजी बँका बंद राहतील.