Bank Holiday in January 2023: 2022 हे वर्ष संपणार आहे. नवीन वर्ष म्हणजे 2023 पुढील आठवड्यापासून सुरू होईल. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम असेल तर ते त्वरित निकाली काढा. जानेवारीत 14 दिवस बँका बंद राहतील. अशा परिस्थितीत बँकेत जाण्यापूर्वी तुम्हाला माहिती घेणे आवश्यक आहे. असे न केल्यास बँकेशी संबंधित तुमचे काम अडकू शकते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नवीन वर्षासाठी बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. तुमच्या बँकेशी संबंधित कामं लवकरात-लवकर पूर्ण करा. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही. येथे आम्ही तुम्हाला नवीन वर्षात म्हणजे जानेवारी 2023 मध्ये कोणत्या तारखांना बँका बंद राहतील? यासंर्भात माहिती देणार आहोत. तुम्ही या तारखा लक्षात ठेवा. यामुळे तुम्हाला बँकेशी संबंधित कामात कोणतीही अडचण येणार नाही. ही यादी पाहून तुम्ही तुमचे बँकिंगचे काम वेळेवर पूर्ण करू शकता. (हेही वाचा -Maharashtra Bank Holidays List 2023: पुढील वर्षी महाराष्ट्रात 24 दिवस बँका राहणार बंद; सरकारने जाहीर केली सुट्ट्यांची यादी (See List))
जानेवारी 2023 मध्ये 14 दिवस बंद राहणार बँका -
- 1 जानेवारी 2023, रविवार - नवीन वर्षाच्या दिवशी देशभरातील बँका बंद राहतील.
- 2 जानेवारी 2023, सोमवार - मिझोराममध्ये बँका बंद राहतील.
- 3 जानेवारी 2023, मंगळवार- इंफाळमध्ये बँका बंद राहतील.
- 4 जानेवारी 2023, बुधवार- गण-नागाई सणानिमित्त इंफाळमधील बँकांना सुट्टी असेल.
- 8 जानेवारी 2023, रविवार - सर्व राज्यांमध्ये बँक सुट्टी.
- 11 जानेवारी 2023, बुधवार- मिझोराममध्ये मिशनरी डे ला बँका बंद राहतील.
- 12 जानेवारी 2023, गुरुवार- स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त बंगालमध्ये बँका बंद राहतील.
- 14 जानेवारी 2023, शनिवार - दुसरा शनिवार / मकर संक्रांतीची सुट्टी.
- 15 जानेवारी 2023, रविवार - पोंगल, माघ बिहू आणि शनिवार व रविवार सुट्टी.
- 16 जानेवारी 2023, सोमवार - चेन्नईमध्ये तिरुवल्लुवर दिनानिमित्त बँकेला सुट्टी.
- 23 जानेवारी 2023, सोमवार- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आसाममध्ये बँका बंद राहतील.
- 26 जानेवारी 2023, गुरुवार - प्रजासत्ताक दिनानिमित्त बँका बंद राहतील.
- 28 जानेवारी 2023, शनिवार - चौथा शनिवार सर्व राज्यांमध्ये बँकेला सुट्टी असेल.
- 29 जानेवारी 2023, रविवार - शनिवार व रविवार
इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगसह तुम्ही तुमची बँकिंगची बहुतांश कामे करू शकता. म्हणजेचं बँकेची शाखा बंद असतानाही तुम्ही तुमची अनेक बँकिंग कामे करू शकता. ग्राहकांसाठी ऑनलाइन बँकिंग पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहे. यासोबतच एटीएम सेवाही सुरू राहणार आहे.
या दिवशी बँकांना राहणार वीकेंडची सुट्टी -
नवीन वर्ष आणि रविवार 1 जानेवारीला बँकेला सुट्ट्या असतील. याशिवाय 8, 15, 22 आणि 29 जानेवारीला रविवार असल्यामुळे देशभरातील बँका बंद राहतील. त्याचबरोबर चौथ्या शनिवारमुळे 14 आणि 28 जानेवारीला बँकेला सुट्टी असणार आहे.