Bank Holidays March 2023: मार्च महिना सुरू होणार आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मार्चमधील दिवसांची यादी जारी केली आहे. या दिवशी बँका राष्ट्रीय किंवा प्रादेशिक सण आणि विशेष उत्सवांसाठी बंद राहणार आहेत. मार्चमध्ये एक-दोन दिवस नव्हे तर एकूण 12 दिवस बँका बंद राहतील. यात वीकेंडचाही समावेश आहे. मार्चमध्ये होळी (होळी 2023) सह अनेक सण साजरे केले जात आहेत. या सणांव्यतिरिक्त, मार्चमध्ये रविवार आणि दुसरा-चौथा शनिवार यासह काही 6 साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश होतो. विशेष म्हणजे, रविवार व्यतिरिक्त देशातील बँका महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी काम करत असतात, तर दुसरा आणि चौथा शनिवारी बँकांना सुट्टी असते.
याशिवाय बँक हॉलिडे देखील वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजऱ्या होणाऱ्या सणांवर किंवा त्या राज्यांमधील इतर कार्यक्रमांवर अवलंबून असतात. त्यामुळे उशीर न करता या महिन्यातच तुमच्या बँकेशी संबंधित सर्व कामांचा निपटारा करा. तथापि, बँकांच्या शाखा बंद असूनही, तुम्ही बँकिंगशी संबंधित काम ऑनलाइन करू शकता. ही सुविधा नेहमीच 24 तास कार्यरत राहील. (हेही वाचा - Holi Special Trains 2023: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई ते जयनगर दरम्यान धावणार 6 होळी स्पेशल ट्रेन)
मार्चमध्ये या दिवशी बँका बंद राहतील -
- 3 मार्च 2023- चापचर कुट
- 5 मार्च 2023 - रविवारची सुट्टी
- 7 मार्च 2023- बेलापूर, गुवाहाटी, कानपूर, लखनौ, हैदराबाद, जयपूर, मुंबई, नागपूर, राची आणि पणजी येथे धुलेती / डोल जत्रा / होळी / यासणाच्या निमित्ताने बँका बंद राहतील.
- 8 मार्च 2023- आगरतळा, अहमदाबाद, ऐझॉल, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहराडून, गंगटोक, इम्फाळ, कानपूर, लखनौ, नवी दिल्ली, पटना, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.
- 9 मार्च, 2023- होळीच्या निमित्ताने फक्त पाटण्यात बँकेला सुट्टी असेल.
- 11 मार्च 2023 - दुसरा शनिवार सुट्टी
- 12 मार्च 2023 - रविवारची सुट्टी
- 19 मार्च 2023 - रविवारची सुट्टी
- 22 मार्च 2023 - बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, आंध्र प्रदेश, तेलंगणा, जम्मू, मुंबई, नागपूर, पणजी, पाटणा आणि श्रीनगर येथे गुढीपाडवा / उगादी / बिहार दिन / साजिबू नोंगमापनबा / प्रथम नवरात्रीनिमित्त बँक बंद / तेलुगु नवीन वर्षाचा दिवस राहील.
- 25 मार्च 2023 - चौथा शनिवार सुट्टी
- 26 मार्च 2023 - रविवारची सुट्टी
30 मार्च 2023- अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, गंगटोक, हैदराबाद, जयपूर, कानपूर, लखनौ, मुंबई, नागपूर, पाटणा, रांची येथे रामनवमीनिमित्त बँका बंद राहतील.