एप्रिलमध्ये बँकांना भेटी देण्याआधी बँकेच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक एकदा नक्की तपासून पहा. दुसरा आणि चौथा शनिवारसह या महिन्यात अनेक सार्वजनिक सुट्ट्या आल्या आहेत. एप्रिलमध्ये नेहमीप्रमाणे बैसाखी, राम नवमी, गुड फ्रायडे आणि महावीर जयंती, आंबेडकर जयंतीची बँकाना सुट्टी असणार आहे. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका आधीच बंद असतात. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होऊ शकते, त्यासाठी आधीच ही सुट्ट्यांची यादी डोळ्याखालून घालून घ्या. राज्यांनुसार वेगवेगळ्या दिवशी बॅंकांची सुट्टी राहणार आहे.
> शनिवार, 6 एप्रिलला महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गोवा आणि गुजरातमध्ये गुढी पाडवा असल्याने बँका बंद राहणार आहेत.
> 13 एप्रिलला दुसरा शनिवार असल्याने त्या दिवशी बँका बंद असतील.
> 17 एप्रिल (बुधवारी) महावीर जयंती असल्या कारणाने अधिकतर राज्यांमध्ये बॅंकाना सुट्टी राहील.
> 19 एप्रिलला गुड फ्रायडे असल्यामुळे शुक्रवारीही बँक बंद असेल. (हेही वाचा: एप्रिल महिन्यात बदलणार 'या' गोष्टी,कोणत्या आहे ते जाणून घ्या)
> त्यानंतर 27 एप्रिलला चौथा शनिवार असल्याने त्या दिवशी बँका बंद असतील.
दरम्यान, 15 एप्रिलला 'हिमाचल दिवस' निमित्त हिमाचल प्रदेशमधील बँकांना सुट्टी असणार आहे. या सुट्ट्या लक्षात घेऊन बँकांची कामे वेळीच उरकल्यास गैरसोय टाळता येईल.