खुशखबर! SBI नंतर Bank of Baroda ने ही केला 'हा' बदल; करोडो ग्राहकांना होणार मोठा फायदा
Bank of Baroda (PC - Facebook)

एसबीआय (SBI) आणि एचडीएफसी (HDFC) बँकेनंतर बँक ऑफ बडोदानेही आपल्या एफडी दरात (FD Rates) बदल केले आहेत. तुमचेही बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मध्ये खाते असेल आणि तुम्ही मुदत ठेव (Fixed Deposite) ठेवली असेल, तर आता तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त व्याजाचा लाभ मिळेल. बँकेने व्याजदरात (Bank FD Rates) बदल केला आहे. मुदत ठेवीचे नवीन दर 25 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत.

बँकेकडून ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत FD ची सुविधा दिली जाते. बँक आधीच ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अधिक व्याजाचा लाभ देते. (वाचा - 'या' दोन सरकारी बँकांनी बदलले FD वरील व्याजदर, जाणून घ्या नवे दर)

नवीन दर 25 फेब्रुवारीपासून लागू -

बँकेने 25 फेब्रुवारीपासून नवीन व्याजदर लागू केले आहेत. या बदलानंतर बँका ग्राहकांना 2.80 टक्के ते 5.25 टक्के व्याजाचा लाभ देत आहेत. बँक कोणत्या कालावधीसाठी FD वर किती फायदा देत आहे ते येथे जाणून घेऊयात...

बँक ऑफ बडोदा एफडी दर-

  • 7 ते 45 दिवस - 2.80 टक्के
  • 46 ते 180 दिवस - 3.70 टक्के
  • 181 ते 270 दिवस - 4.30 टक्के
  • 271 दिवसांपासून एक वर्षापेक्षा कमी FD वर - 4.40 टक्के
  • एका वर्षाच्या FD वर - 5%
  • एक वर्षापेक्षा जास्त आणि 400 दिवसांच्या FD वर - 5.10 टक्के
  • 400 दिवसांपासून ते 2 वर्षांपर्यंतच्या FD वर - 5.10 टक्के
  • 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपर्यंतच्या FD वर - 5.10 टक्के
  • 3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपर्यंतच्या FD वर - 5.25 टक्के
  • 5 वर्षांपेक्षा जास्त आणि 10 वर्षांपर्यंतच्या FD वर - 5.25 टक्के

FD वर मिळेल फायदा -

बँकेच्या वतीने, ग्राहकांना 7 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 2.80 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळत आहे. याशिवाय तुम्ही 46 दिवसांपासून 180 दिवसांपर्यंत FD केल्यास ग्राहकांना 3.70 टक्के दराने व्याज मिळत आहे. अलीकडेच देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI आणि खाजगी क्षेत्रातील HDFC बँकेने व्याजदरात वाढ केली आहे.