आयकर विभागाने (Income Tax Department) आधार-पॅन कार्ड लिंक (Aadhaar-PAN Link) करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता 30 जून 2021 पर्यंत आधार-पॅन कार्ड तुम्ही लिंक करु शकता. यापूर्वी ही तारीख 31 मार्च 2021 ही होती. गेल्या वर्षभरापासून थैमान घालणाऱ्या कोविड-19 संकटामुळे (Covid-19 Pandemic) मुदतवाढ देण्यात आली आहे. आयकर विभागाने ट्विटच्या माध्यमातून ही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. या मुदतवाढीमुळे देशभरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
आधार-पॅन लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2021 ऐवजी 30 जून 2021 करण्यात आली आहे. कोविड-19 संकटामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच इन्कम टॅक्स अॅक्ट 1961 च्या सेक्शन 148 अंतर्गत डेट ऑफ इश्यू आणि Dispute Resolution Panel (DRP) ने इश्यू केलेल्या consequential order ची अंतिम तारीख देखील 30 एप्रिल 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे, असे आयकर विभागाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Income Tax India Tweet:
Date for issue of notice under section 148 of Income-tax Act,1961, passing of consequential order for direction issued by the Dispute Resolution Panel (DRP) & processing of equalisation levy statements also extended to 30th April, 2021.(2/2)
— Income Tax India (@IncomeTaxIndia) March 31, 2021
(हे ही वाचा: Rules Changing From 1st April: नव्या आर्थिक वर्षात बदलणार हे '6' नियम)
आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरुन आधार-पॅन कार्ड लिंक करता येईल. दिलेल्या अंतिम तारखेपर्यंत आधार-पॅन लिंक न केल्यास कार्ड्स निष्क्रिय ठरतील, असा इशारा सरकारकडून देण्यात आला आहे.