Aadhaar Card for NRIs: नव्या अर्थसंकल्पात NRI's साठी खास सुविधा; आता भारतात येताच मिळणार आधार कार्ड
Aadhaar Card (Photo Credits: PTI)

Budget 2019 Highlights: अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitharaman) यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला. या नव्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी विविध सवलती दिल्या गेल्या आहेत. तर एनआरआय (NRI) साठी विशेष सुविधा सुरु करण्यात येणार आहे. पूर्वी एनआयआर (NRI) ना भारतात आल्यानंतर आधारकार्डसाठी 180 दिवस वाट पाहावी लागत असे. मात्र आता एनआरआय (NRI) पासपोर्टसह भारतात आल्यानंतर लगेचच त्यांना आधार कार्ड दिले जाईल.

ANI ट्विट:

त्यामुळे आता एनआरआय ना आधार कार्डसाठी 180 दिवस वाट पाहण्याची गरज नाही. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे एनआरआय यांना दिलासा मिळणार आहे. याशिवाय आता इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी पॅन कार्ड आधार कार्ड ग्राह्य धरले जाणार असल्याचीही घोषणा नव्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.