7th Pay Commission | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

7th pay commission update: महागाई भत्ता (Dearness Allowance) वाढीची घोषणा कधी होते याकडे डोळे लावून बसलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. येत्या होळीपर्यंत (8 मार्च) ही बातमी मिळणार असल्याचे समजते. केंद्र सरकार त्या दृष्टीने पावले टाकत आहे. दरम्यान, नक्की घोषणा कधी होते याबाबत उत्सुकता आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना होळी 2023 पूर्वी DA वाढ मिळू शकते. एआयसीपीआय (AICPI) निर्देशांका नुकताच प्रसिद्ध झाला. त्यातून ही माहिती पुढे आली आहे. केंद्र सरकार सरकार पुन्हा एकदा महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवू शकते.

सरकार वर्षातून दोनदा डीए वाढवते. ही डीए वाढ जानेवारी आणि जुलै महिन्यात जाहीर केली जाते. आता नवीन वर्ष सुरू झाले असून केंद्र सरकारचे कर्मचारी त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याची प्रतीक्षा करत आहेत. केंद्र सरकार, आकडेवारीनुसार, महागाई भत्त्यात 4% किंवा 3 % वाढ करू शकते. (हेही वाचा, 7th Pay Commission: नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार? केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय)

दरम्यान, महागाई भत्त्यात वाढ करण्यासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये AICPI निर्देशांकात 0.4 अंकांची वाढ करणे आवश्यक असते. सरकारने डीए 4 टक्क्यांनी वाढवल्यास महागाई भत्ता 42 % होईल. जुलै 2022 मध्ये केंद्र सरकार डीए चार टक्क्यांनी वाढवणार आहे. हिंदी वेबसाईट झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, डीए आणि डीआर वाढल्यानंतर, 48 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना फायदा होईल.