National Space Day: चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर भारत सरकारची मोठी घोषणा; दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार 'राष्ट्रीय अंतराळ दिन'
Chandrayaan3 launched into orbit. (Photo Credits: twitter/@chandrayaan_3)

National Space Day: चांद्रयान-3 (Chandrayaan-3) मोहिमेच्या यशाची आठवण म्हणून भारत सरकारने (Indian Government) दरवर्षी राष्ट्रीय अंतराळ दिवस (National Space Day) साजरा करण्याची घोषणा केली आहे. याबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. आता दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी 'राष्ट्रीय अंतराळ दिन' साजरा केला जाईल.

दरम्यान, 23 ऑगस्ट 2023 रोजी, चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरचे लँडिंग आणि प्रज्ञान रोव्हरच्या तैनातीसह चांद्रयान-3 च्या यशामुळे, भारत चंद्रावर उतरणारा चौथा देश बनून अंतराळ आघाडीच्या राष्ट्रांच्या श्रेणीत सामील झाला आहे. तसेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा भारत पहिला देश ठरला आहे. या ऐतिहासिक मिशनचे परिणाम मानवजातीला पुढील अनेक वर्षांसाठी फायदेशीर ठरणार आहेत. (हेही वाचा -Chandrayaan 3 Mission Update: चंद्रावर सूर्योदय,  Vikram lander आणि Pragyan rover पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता)

अंतराळ मोहिमांच्या क्षेत्रात देशाची प्रगती युवा पिढीला एस.टी. ई.एम. विकसित करण्यास प्रोत्साहित करत आहे. हा दिवस या विषयाच्या अभ्यासात रुची वाढवण्यासाठी आणि अवकाश क्षेत्रात व्यापक प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. म्हणूनच भारत सरकारने दरवर्षी 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय दिन म्हणून घोषित केला आहे.