India Post Recruitment 2022: पोस्टाकडून बंपर नोकरभरतीची घोषणा, 38,926 जागांवर होणार भरती; 5 जून पूर्वी असा करा अर्ज
पोस्ट ऑफिस (प्रातनिधिक-संग्रहित-संपादित प्रतिमा)

भारतीय पोस्ट विभागाकडून (India Post) ग्रामीण डाक सेवक पदांसाठी 38, 926 बंपर नोकरभरती जाहीर केली अअहे. यामध्ये ब्रांच पोस्ट मास्टर (Branch Post Masters), असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (Assistant Branch Post Masters) आणि डाक सेवक (Gramin Dak Sevaks) यांचा समावेश असणार आहे. दरम्यान भारतीय पोस्ट विभागाची अधिकृत वेबसाईट indiapostgdsonline.gov.in वर याचं सविस्तर पत्रक जारी करण्यात आले आहे. किमान 10वी पास अशी या नोकरभरती मध्ये शैक्षणिक पात्रता निकष असल्याने मोठ्या प्रमाणात उमेदवारांकडून अर्ज येण्याची शक्यता आहे. दरम्यान 5 जून पर्यंत या नोकरभरतीसाठी अर्ज दाखल करता येणार आहे. 2 जून 2022 पासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.

वय, शिक्षण पात्रता निकष

5 जून पर्यंत अर्ज करणार्‍या उमेदवाराचं किमान वय 18 कमाल वय 40 वर्ष असणं आवश्यक आहे.शैक्षणिक पात्रतेमध्ये उमेदवार किमान 10वी पास असावा. त्याला एक स्थानिक भाषा येणं आवश्यक आहे. शिक्षणामध्ये इंग्रजी आणि गणित या विषयामध्ये उमेदवार उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

पगार किती?

ब्रांच पोस्ट मास्टरला 12 हजार, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवकाला 10 हजार रूपये पगार दिला जाणार आहे. अर्ज करताना 100 रूपये प्रवेश शुल्क असेल. तर महिला ,एससी, एसटी, दिव्यांग, ट्रान्सवूमन यांना प्रवेशशुल्क माफ असणार आहे. इथे पहा नोकर भरतीची सविस्तर माहिती देणारं परिपत्रक .

कसा कराल ऑनलाईन अर्ज? 

 

indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. अत्यावश्यक माहिती भरा. अर्ज दाखल करताना तुम्ही 10वीची गुण्पत्रिका, स्कॅन केलेला फोटो, स्वाक्षरी आणि अन्य कागदपत्रं अपलोड करावी लागणार आहेत. हे देखील नक्की वाचा: Konkan Railway  Recruitment 2022: कोकण रेल्वेमध्ये नोकरीची संधी; 10 पासून सुरू होणार मुलाखती .

मेरीट लिस्टच्या आधारे उमेदवारांची अंतिम यादी तयार केली जाणार आहे.  यामध्ये दहावीच्या मार्कांचा विचार केला आहे. दरम्यान यामध्ये उच्च शैक्षणिक पात्रतेचा विचार केला जाणार नाही असं सांगण्यात आले आहे.