भारत म्हणजे जगाची 'रेप कॅपिटल', राहुल गांधी यांचे वायनाडमध्ये खळबळजन वक्तव्य
राहुल गांधी | (Photo Credit: IANS)

काँग्रेस पक्षाचे नेत राहुल (Rahul Gandhi) गांधी यांनी भारत जगाची 'रेप कॅपिटल' (Rape Capital) म्हणजेच बलात्कारांची राजधानी म्हटले आहे, असं म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी शनिवारी वायनाडमधील एका कार्यक्रमात हे खळबळजन वक्तव्य केले आहे. त्यामुळे भाजपने राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. देशभरामध्ये महिलांविरोधात वाईट घटना घडत असताना राहुल आणि प्रियंका गांधी यावरून राजकारण करत आहेत, असा आरोप भाजपने केला आहे.

राहुल गांधी शनिवारी वायनाड या त्यांच्या लोकसभा मतदारसंघात दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, भारत आपल्या आई बहिणींची सुरक्षा का करु शकत नाही? असा प्रश्न दुसरे देश विचारत आहेत. एका भाजप नेत्याने महिलेचा बलात्कार केला. पंरतु, त्यावर पंतप्रधान मोदी काहीही बोलले नाही, असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले. (हेही वाचा - उन्नाव येथील दुष्कर्माविरोधात सफदरजंग रुग्णालयाबाहेर एका अंदोलनकर्त्या महिलेचा 6 वर्षीय चिमुकलीला जाळण्याचा प्रयत्न)

राहुल गांधी यांच्या खळबळजनक वक्तव्यानंतर भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी राहुल गांधींचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे, अशी टीका केली आहे. राहुल गांधी भारताचा गौरव करू शकत नाहीत. प्रत्येक वेळी त्यांच्या विधानांमधून त्याचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे, असे वाटते. यापूर्वी त्यांनी पंतप्रधानांसाठी चुकीचा शब्द वापरला होता. त्यानंतर त्यांना न्यायालयात माफी मागावी लागली होती, असेही मनोज तिवारी म्हणाले.