Indian Army (Pic Credit - ANI)

भारत आणि पाकिस्तान (India and Pakistan) यांच्यातील गेल्या वर्षभरातील सर्व कटू आठवणी बाजूला ठेवून पुन्हा एकदा चांगली सुरुवात करण्यात आली आहे.  शनिवारी नवीन वर्षाच्या प्रारंभा निमित्त भारतीय लष्कर (Army) आणि पाकिस्तानकडून एकमेकांना मिठाई देण्यात आली. भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेवर (LOC) नवीन वर्षाचे स्वागत करत पाकिस्तानी लष्कराला मिठाई दिली. भारतीय लष्कराकडून मिळालेल्या माहितीनुसार, चार सीमावर्ती भागात भारतीय आणि पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी मिठाईची देवाणघेवाण केली. आज नियंत्रण रेषेवर मेंढर हॉट स्प्रिंग्स क्रॉसिंग, पूंछ रावळकोट क्रॉसिंग, चकोटी उरी क्रॉसिंग आणि चिलियाना तिथवाल क्रॉसिंग येथे एकमेकांमध्ये मिठाईची (Sweet) देवाणघेवाण केली.

भारतीय लष्कराच्या या प्रयत्नांमुळे नियंत्रण रेषेवरील युद्धविराम किंवा नियंत्रण रेषेवर शांतता राखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे सीमाभागातील नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर नियंत्रण रेषेलगतच्या गावांमध्ये शांतता राखण्यासाठी भारतीय लष्कराच्या या प्रयत्नांचे तेथील स्थानिकांनीही कौतुक केले आहे. दोन्ही देशांच्या लष्करांमधील युद्धविरामाची स्थिती कायम ठेवण्यासाठी असे प्रयत्न उपयुक्त ठरतील, हे नाकारता येत नाही.

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 2022 च्या सुरुवातीला, परस्पर विश्वास आणि शांतता वाढवण्यासाठी, भारतीय सैन्याने पूंछ आणि मेंढर क्रॉसिंग पॉइंट्सवर पाकिस्तानी सैन्यासोबत मिठाई आणि शुभेच्छांची देवाणघेवाण केली. भारत-पाकिस्तान सीमेवर सुरू असलेल्या युद्धविरामाचा विचार करून, जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता आणि सौहार्द वाढवण्याच्या उद्देशाने हा इशारा आहे.

तसेच याआधीही दिवाळीत भारतीय लष्कराकडून पाकिस्तानी लष्कराला मिठाई देण्यात आली होती. गेल्या वर्षी दिवाळीत सीमा सुरक्षा दल आणि पाकिस्तान रेंजर्समध्ये मिठाईची देवाणघेवाण झाली होती. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रक्रियेत अशा प्रयत्नांचे मोठे योगदान आहे.