Independence Day (Photo Credits: PixaBay)

15 ऑगस्टला येणा-या 73 व्या स्वातंत्र्यदिनाची सर्वत्र जय्यत तयारी सुरु झाली असून सर्वांना उत्सुकता लागलीय ती लाल किल्ल्यावर होणा-या सोहळ्याचे साक्षीदार होण्याची तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) भाषणाची. यंदाचे वर्ष राजकारणात तसेच भारतीय अर्थकारण बरेच घडामोडींचे वर्ष होते. त्यात सलग दुस-यांदा पंतप्रधानपदावर नाव कोरलेल्या मोदींसाठीही हे वर्षे खास होते. भारतातील या बदलांचा, घडामोडींचा आढावा उद्याच्या भाषणात घेतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या सुवर्ण सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी तसेच याची इत्यंभूत माहिती आपल्या पर्यंत पोहोचावी आणि हा सोहळा Live पाहता यावा यासाठी दूरदर्शन (Doordarshan) वाहिनीने विशेष पाऊल उचचले आहे.

मोदींचे लाइव्ह भाषण पाहण्यासाठी दूरदर्शनच्या युट्यूब ला भेट द्या. तसेच जर गुगल वर 'India Independence Day' असे शोधलात तर तुम्हाला हे भाषण मोबाईलवर तसेच डेस्कटॉपवरही पाहता येईल.

मिंटच्या बातमीनुसार, गुगलने राष्ट्राचे महत्व लोकापर्यंत पोहचावे म्हणून प्रसार भारती शी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिन, मतदान दिवस यांसारख्या महत्वपुर्ण दिवसांचा   लेखाजोगा आपण अगदी सहजपणे गुगलवर पाहू शकतो.

शशी शेखर यांचे ट्विट:

प्रसार भारती चे संचालक शशी शेखर यांनी आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे, की 'भारताच्या पंतप्रधानांचे भाषण दूरदर्शनच्या माध्यमातून आता गुगलवर देखील सर्च केले जाणार आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असून आम्ही यासाठी खूपच उत्साही आहोत. यामुळे जगाच्या पाठीवर कुठेही असले, तरीही हा सोहळा पाहता येईल असेही ते पुढे म्हणाले.

हेही वाचा- 73rd Indian Independence Day 2019: स्वातंत्र्यदिनानिमित्त जाणून घ्या भारताविषयी 5 अचंबित करणा-या गोष्टी

हे सर्व करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे प्रसार भारतीचे कटेंट आणि राष्ट्रीय सणांचे माहिती त्याचे महत्व हे जागतिक स्तरावर लोकांपर्यंत पोहोचले जाईल. ज्याचा फायदा हा भारताला ही होऊ शकतो आणि भारतीय सणांची ख्याती सा-या जगभरात पोहोचेल.