Coronavirus Lockdown: 'डी मार्ट'चे मालक राधाकृष्ण दमानी यांच्या संपत्तीत वाढ; भारतातील सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत मिळवले दुसरे स्थान
Radhakrishna Damani (PC -twitter)

Coronavirus Lockdown: कोरोना विषाणुने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अशातचं फोर्ब्स मासिकाने भारतातील श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. या यादीत भारतातील पहिल्या दहा अब्जाधीशांचा समावेश आहे. यात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी पहिल्या स्थानी तर डीमार्टचे मालक राधाकृष्ण दमानी (Radhakrishna Damani) दुसऱ्या स्थानी आहेत.

जगभरातील कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या फोर्ब्स मासिकाने भारताच्या 2020 टॉप अब्जाधीशांची 34 वी वार्षिक यादी जाहीर केली आहे. यात राधाकृष्ण दमानी यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे दमानी हे भारतातील दुसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. (हेही वाचा - Coronavirus Outbreak In India: भारतात गेल्या 24 तासात 905 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तर 51 जणांचा मृत्यू; देशातील कोरोना बाधितांची संख्या 9352 वर पोहोचली)

राधाकृष्ण दमानी हे 'रिटेल किंग ऑफ इंडिया' म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची एकूण मालमत्ता 16.6 अब्ज डॉलर्स एवढी आहे. दमानी यांनी 2002 मध्ये रिटेलिंग क्षेत्रात प्रवेश केला होता. भारतात डी मार्टच्या अनेक शाखा आहेत. दमानी यांनी शि‍व नाडर, गौतम अदाणी यांना मागे टाकत भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवलं आहे.

गेल्या आठवड्यात एव्हेन्यू सुपरमार्केटचे शेअर 5 टक्क्यांनी वधारले. त्यामुळे दमानी यांच्या उत्पन्नात वाढ झाली. शनिवारी दमानी यांचं उत्पन्न 17.8 अरब डॉलर पर्यंत पोहोचलं. दमानी नंतर श्रीमंत भारतीयांच्या यादीत एचसीएलचे श‍िव नाडर, उदय कोटक आणि गौतम अदाणी यांचा क्रमांक लागतो.