Coronavirus Outbreak In India: भारतात गेल्या 24 तासात 905 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 51 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांची संख्या 9352 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत 324 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील 8048 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच 980 जणांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. यासंदर्भात आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने (Ministry of Health and Family Welfare) माहिती दिली आहे.
देशात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. आज सकाळच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात 82 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 2064 वर पोहोचली आहे. यामध्ये मुंबई शहरात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आले आहे. (हेही वाचा - RRB Railway Recruitment 2020: भारतीय रेल्वेमध्ये विविध वैद्यकीय पदांसाठी भरती जाहीर; कोणत्याही लेखी परिक्षेशिवाय होणार थेट निवड)
905 new positive cases and 51 deaths reported in the last 24 hours as India's total number of #Coronavirus positive cases rises to 9352, death toll stands at 324. https://t.co/3bApqH35nd
— ANI (@ANI) April 13, 2020
Hydroxychloroquine औषध घेण शरीराला ठरू शकत घातक ; डॉक्टरांनी सांगितले होणारे परिणाम : Watch Video
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेत भारत देश 21 दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. 24 मार्च पासून पुढील 21 दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. उद्या हा कालावधी संपणार आहे. त्यामुळे उद्या नरेंद्र मोदी सकाळी 10 वाजता जनतेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे उद्या मोदी काय बोलणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.