Income Tax Slabs (Photo Credits: File Photo)

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी मोदी सरकार 2.0 चा दुसरा अंतरीम अर्थसंकल्प (Budget 2019) सादर केला. या अर्थसंकल्पात नोकरदारांना दिलासा म्हणजे, 5 लाख रुपये उत्पन्नावर कोणताही कर (Tax) असणार नाही. मात्र 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना जुन्या रचनेप्रमाणेच कर भरावा लागणार आहे. कराची 5 लाखाची मर्यादा मोदी सरकारच्या फेब्रुवारी मधील अंतरीम अर्थसंकल्पात मांडण्यात आली होती. या नव्या अर्थसंकल्पात त्यात कोणताही बदल करण्यात आला नाही.

कराच्या मर्यादेत कोणताही बदल घडला नसला तरी, श्रीमंतांचा सरचार्ज (Surcharge) म्हणजे अधिभार मात्र वाढला आहे. आता नव्या अर्थसंकल्पानुसार, 2 लाख ते 5 कोटी उत्पन्न असणाऱ्यांसाठी 3 टक्के सरचार्ज भरावा लागेल. तर 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर 7 टक्के सरचार्ज भरावा लागेल. याचाच अर्थ सर्वसामान्य नागरिकांऐवजी श्रीमंताकडून कराची ज्याचा रक्कम वसुल केली जाणार आहे. (हेही वाचा: Budget 2019: छोट्या दुकानदारांना-व्यापाऱ्यांना मिळणार 3 हजार रुपयांपर्यंत पेन्शन)

दरम्यान, याआधी अडीचशे कोटी वार्षिक उलाढाल असलेल्या कंपन्यांसाठी कॉर्पोरेट टॅक्स 25 टक्के होता. आता या स्लॅबची मर्यादा वाढवून चारशे कोटी वार्षिक उलाढाल असलेल्या कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच आता इन्कम  टॅक्स (Income Tax) भरण्यासाठी पॅनकार्ड (PAN Card) ची आवश्यकता असणार नाही. तुम्ही आधार कार्डद्वारे तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करू शकता.