Budget 2019: छोट्या दुकानदारांना-व्यापाऱ्यांना मिळणार 3 हजार रुपयांपर्यंत पेन्शन
Union Budget 2019 (File Image)

मोदी सरकारच्या (Modi Government) दुसऱ्या पर्वातील आज पहिले अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी लोकसभेत सादर केले आहेत. या अर्थसंकल्पानुसार आता छोट्या दुकानदारांना-व्यापाऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे या विभागातील व्यापाऱ्यांपासून-दुकानदारांना दिलासा मिळणार आहे.

मोदी सरकारने लोकसभा निवडणूक जिंकत मोठा विजय मिळवला. त्यानंतर आज मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील पहिले अर्थसंकल्प सादर करण्यात आले असून छोट्या दुकानदारांना आणि व्यापाऱ्यांना 60 वर्ष पूर्ण कराणाऱ्यांना 3 हजार रुपयांपर्यंत पेन्शन लागू करण्यात येणार आहे. परंतु ज्या वापाऱ्यांची आर्थिक उलाढाल दीड कोटीपेक्षा कमी आहे त्यांनाच या सुविधेचा फायदा होणार आहे. तर मध्यम आणि लघु उद्योगांना चालना देण्यासाठी 350 कोटी रुपये केंद्र सरकारकडून देण्यात येणार आहेत.(Budget 2019 Live News Updates: पेट्रोल, डिझेल, सोनं महागणार)

महिला उद्योजिका बनवणं हे उद्दिष्ट असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुद्रा स्कीम अंतर्गत 1 लाख रूपयांचं कर्ज महिलांना मिळणार. त्याचसोबत आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पानुसार 400 कोटी टर्न ओव्हर असणार्‍यांना 25% टॅक्स लागू होणार आहे. तर Direct Tax मध्ये 78% वाढ करण्यात आली असून घर, विकास आणि स्टार्टअप साठी फायदेशीर ठरणार आहे.