Uttar Pradesh Rape Case: उत्तर प्रदेशमध्ये 9 वर्षाच्या मुलीवर दारूच्या नशेत शेजारच्याने केला बलात्कार, आरोपीला अटक
Rape | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

बरेलीमधून (Bareilly) बलात्काराचे (Rape) एक प्रकरण उघडकीस आले आहे. जिथे एका शेजाऱ्याने (Neighbors) दारूच्या नशेत तिसरीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. पीडितेच्या शेजाऱ्याला मुलीच्या कुटुंबीयांनी 25 सप्टेंबर रोजी पत्नी आणि मुलासह जेवणासाठी आमंत्रित केले होते. जेव्हा कुटुंबातील सदस्य संभाषणात गुंतले होते. तेव्हा आरोपी मुलीला घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. त्याने तिला गंभीर परिणामांची धमकी दिली आणि कोणालाही या घटनेबद्दल सांगू नका असे सांगितले. मुलीने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये वेदना झाल्याची तक्रार केल्यानंतर आणि अल्पवयीन मुलीच्या आजीने चौकशी केल्यावर तिने सांगितले की तिच्या काकांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

मुलीच्या पालकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली आणि बुधवारी आरोपीला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले. बरेलीच्या वरिष्ठ पोलिसांनी सांगितले की, रोहित सिंग सजवान हाआरोपी कुटुंबाला ओळखतो आणि त्याने मुलीला शांत राहण्याची धमकी दिली होती. ती घाबरली आणि तिने आजीला अत्याचार झाल्याचे दोन दिवसांनी सांगितले. इज्जतनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. हेही वाचा  Karnataka Suicide Case: कर्नाटकमध्ये नवऱ्याच्या मृत्यूनंतर परिस्थितीला कंटाळून पत्नीने उचलले टोकाचे पाऊल, तीन मुलींसह केला आत्महत्येचा प्रयत्न

तक्रारीनंतर पोलिसांनी आयपीसीच्या कलम 376 बलात्कार, 506 गुन्हेगारी धमकी आणि पॉक्सो कायद्यासह एफआयआर नोंदवला आहे. पीडितेच्या वैद्यकीय तपासणीत लैंगिक अत्याचाराची पुष्टी झाली आहे. बरेली एसएसपी म्हणाले, अल्पवयीन मुलीवर उपचार करण्यात आले आहेत आणि तिला आणि तिच्या पालकांना योग्य क्‍लांसिंग पुरवले जाईल. जेणेकरून क्लेशकारक अनुभवावर मात करता येईल. आरोपींनी अल्कोहोलच्या प्रभावाखाली मुलीवर बलात्कार केल्याची कबुली दिल्यानंतर त्याला तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

त्या व्यक्तीची पत्नी चार महिन्यांची गर्भवती आहे. तिच्या नवऱ्याच्या घृणास्पद कृत्याबद्दल तिला वाईट वाटले आहे. मात्र असे असूनही पत्नी पीडित कुटूंबाच्या बाजूने उभी राहिली आहे.