PM Narendra Modi (PC - ANI)

देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास हा काही वर्षांचा किंवा काही लोकांचा नसून देशाच्या कानाकोपऱ्यातील बलिदानाचा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी सांगितले. अल्लुरी सीताराम राजू (Alluri Sitaram Raju) यांच्या 30 फुटांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण (Unveiling of the bronze statue) केल्यानंतर आपल्या भाषणात मोदी म्हणाले की, महान स्वातंत्र्यसैनिकाची 125 वी जयंती आणि रामपा बंडाची शताब्दी वर्षभर साजरी केली जाईल. स्वातंत्र्य लढा हा केवळ काही वर्षांचा, काही प्रदेशांचा किंवा काही लोकांचा इतिहास नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातून बलिदानाचा इतिहास आहे, ते म्हणाले.

अल्लुरी सीताराम राजू यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना, पंतप्रधान मोदी म्हणाले की त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात लवकर भाग घेतला. आदिवासी कल्याण आणि देशासाठी स्वतःला समर्पित केले आणि लहान वयातच शहीद झाले. त्यांचे जीवन एक प्रेरणा आहे, असे ते म्हणाले. अल्लुरी भारताच्या संस्कृतीचे, आदिवासींच्या अस्मितेचे आणि मूल्यांचे प्रतीक होते. स्वातंत्र्यलढ्यात ज्याप्रमाणे तरुण सामील झाले, तसेच आताच्या तरुणांनी देशाची स्वप्ने साकार करण्यासाठी पुढे यायला हवे, असे मोदींनी लोकसंख्येतील तरुण वर्गाला उद्युक्त केले. हेही वाचा Delhi Shocker: पाळीव कुत्रा भुंकल्याने तरुणाला आला राग, संतापलेल्या व्यक्तीने शेजारच्यांना केली मारहाण, पहा व्हिडीओ

पंतप्रधान पुढे म्हणाले, मी तुम्हाला सांगू इच्छितो की, त्याचवेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी राम्पा क्रांतीला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. आपला नवा भारत हा त्या सैनिकांच्या स्वप्नांचा भारत असावा ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. गेल्या 8 वर्षात आम्ही पूर्ण निष्ठेने काम केले आहे, अल्लुरी सीताराम राजू यांच्या तत्वांना अनुसरून आदिवासींच्या कल्याणासाठी, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही काम केले आहे.

पंतप्रधान मोदींचे सोमवारी सकाळी 10.10 वाजता हैदराबादहून विशेष विमानाने गन्नावरम येथील विजयवाडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. तेथे त्यांचे आंध्र प्रदेशचे राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन आणि मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी स्वागत केले. सकाळी 11 वाजता स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी 'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत सीताराम राजू यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित जाहीर सभेला संबोधित केले. त्यानंतर पीएम मोदी दुपारी 1.05 वाजता विजयवाडा विमानतळावर परतले आणि तेथून अहमदाबादला रवाना झाले.