Delhi Shocker: पाळीव कुत्रा भुंकल्याने तरुणाला आला राग, संतापलेल्या व्यक्तीने शेजारच्यांना केली मारहाण, पहा व्हिडीओ
Delhi Dog Incident. (Photo Credits: Twitter | ANI)

दिल्लीच्या (Delhi) पश्चिम विहारमध्ये एका व्यक्तीने त्याच्या शेजाऱ्याच्या कुटुंबातील तीन सदस्यांवर हल्ला (Attack) केला. कारण त्यांचा कुत्रा त्याच्यावर भुंकला. प्रथम त्यांच्यावर वीट फेकल्यानंतर त्या व्यक्तीने त्यांना जखमी करण्यासाठी लोखंडी पाईपचा वापर केला. शेजारी असलेल्या रक्षितने घटनेचे वर्णन करताना सांगितले की, धरमवीर दहिया हा आमचा शेजारी आहे आणि आमच्या घरातून जात असताना गेटवर बसलेला आमचा पाळीव कुत्रा त्याच्यावर भुंकला. यामुळे त्याला खूप राग आला आणि त्याने कुत्र्याला शेपटीने पकडले. त्याला मारायला सुरुवात केली. हेही वाचा Sharad Pawar: शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी, 6 महिन्यात सरकार कोसळेल, मध्यवर्ती निवडणूकीला तयार राहा - शरद पवार

रक्षितने नंतर मध्यस्थी केली. त्यानंतरही वाद सुरू होता. यादरम्यान धरमवीरने त्याच्यावर वीट मारली. तो लोखंडी पाईप घेण्यासाठी आत गेला आणि त्याने रक्षितशिवाय कुटुंबातील इतर दोन सदस्यांना मारहाण केली. धरमवीरने आधी कुत्र्याला लोखंडी पाईपने मारले.

यानंतर रक्षितच्या मामावर पाईपने हल्ला केला, त्यामुळे तो जागीच पडला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. रक्षितच्या वक्तव्यावरून, प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आयपीसीच्या कलम 579, 22, 308, 323, 341 आणि 451 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.