Mohan Yadav On Madhya Pradesh Education: मध्य प्रदेशमध्ये शाळा आणि महाविद्यालयांमध्ये राम-कृष्णाचे धडे शिकवले जाणार; मुख्यमंत्री मोहन यादव यांची घोषणा

Mohan Yadav On Madhya Pradesh Education: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शुक्रवारी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव (CM Mohan Yadav)यांनी मोठी घोषणा केली. राज्यातील उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षणात राम(Lord Ram) आणि कृष्णाचे(Krishna) धडे दिले जातील, असे ते म्हणाले. योग दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर राज्याची राजधानी भोपाळ येथे पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले, राज्य सरकारने राम पथ गमन आणि श्री कृष्ण पथ गमन हे दोन प्रकल्प हाती घेतले आहेत. ज्यात राज्यातील प्रभू राम आणि कृष्ण यांनी भेट दिलेल्या ठिकाणांना तीर्थक्षेत्र म्हणून विकसित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. (हेही वाचा:Rahul Gandhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शपथविधीदरम्यान राहुल गांधींनी दाखवली संविधानाची प्रत; काँग्रेसकडून व्हिडिओ शेअर(Watch Video))

आगामी योजनेचा संदर्भ देत मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की, प्रभू राम आणि कृष्ण यांच्या कर्तृत्वाचाही उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार आहे. सरकार स्थापनेनंतर भाजपच्या जाहीरनाम्यात नमूद केलेल्या गोष्टींवर निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यात राम पथ गमन योजनेवर सरकार दीर्घकाळापासून काम करत आहे. प्रभू राम वनवासात ज्या ठिकाणाहून गेले होते ते ही आहेत. या ठिकाणांचा विशेष विकास करून त्यांना तीर्थक्षेत्र बनवण्याची सरकारची योजना आहे. सरकारने यासाठी काही जिल्ह्यांची निवडही केली आहे.