Delhi Crime: दिल्लीत अनैसर्गिक लैंगिक संबंधाचा दबावाला कंटाळून मित्राची केली हत्या, आरोपीला अटक
Denial of Sex | (Photo courtesy: archived, edited, symbolic)

Delhi Crime: अनैसर्गिक लैंगिक संबंधाचा दबावाला कंटाळून रागाच्या भरात एका मित्राची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडीस आली आहे. मृत तरुण आणि आरोपी हे जिवलग मित्र होते. रागाच्या भरात २० वर्षीय व्यक्तीने दगडाने ठेवून मित्राची हत्याची परिसरात खळबळ आहे. दोघेही बिहारच्या मधेपूरची असून, उत्तर दिल्लीतील मोरी गेट येथील रेन बसेरा येथे राहत होते. मोरी गेट येथे एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याचे काश्मिरी गेट पोलिस ठाण्यात फोन आला.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ जानेवारी तरुणाची हत्या करण्यात आली. अनैसर्गिक लैंगिक संबंधाला कंटाळून हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांचे एक पथक घटनास्थळी आले, तेव्हा तरुणाच्या तोंडावर अनेक जखमा होत्या, तोंड संपुर्ण रक्ताने माखलले होत. डोळ्याच्या वरच्या भागावर अनेक जखमा होत्या. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. उत्तर विभागाचे पोलिस उपायुक्त मनोज कुमार मीना यांनी या प्रकरणात कारवाई सुरु केली आहे. मोरी गेट येथील खोया मंडई परिसरातील ५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहे.

प्रमोद कुमार शुक्ला असं मृत व्यक्तीची ओळख समोर आले आहे. पोलिसांच्या असे निदर्शनात आले की, प्रमोद यांच्यावर आरोपी मित्र  राजेश यांच्यात मारामारी झाली होती. पोलिसांनी दोघांच्या मोबाईल ताब्यात घेऊन तपासणी सुरु केली. राहत्या घरातून राजेश हा फरार होता. त्यामुळे पोलिस आरोपीच्या शोधात आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर गुन्हा कबुल केला. प्रमोद राजेशवर अनैसर्गिक लैंगिक संबंधाचा दबाब टाकत असल्याने टोकाचे पाऊल उचलले आहे.या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.