Get Pregnant in 15 Minutes: छत्तीसगड (Chhattisgarh) मधील अधिकाऱ्यांनी बुटीपाली गावातील (Butipali Village) 'बाबांचा दरबार' (Buti Wale Baba Darbar) बंद केला आहे. या गावात 36 वर्षीय पितांबर जगत, ज्याला जगत बाबा म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी महिलांना लिंबू चाटून गर्भधारणेसाठी मदत (Lemon Lick Claims to Get Pregnant) करण्याचा दावा केला होता. लिंबू चाटल्यानंतर 15 मिनिटांत महिला गर्भवती होईल, असा दावा ‘बुटी वाले बाबा’ (Buti Wale Baba) ने केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे छत्तीसगड आणि ओडिशा, झारखंड यांसारख्या शेजारील राज्यांमधून लोक लिंबू चाटण्यासाठी बुली वाले बाबांकडे येत असतं.
दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, जगत बाबा दर मंगळवार आणि शनिवारी त्यांच्या निवासस्थानी सत्र आयोजित करतात. या सत्रात ज्या स्त्रियांना गर्भधारणा होऊ शकत नाही त्यांना लिंबू चाटायला लावून तसेच 'मदार' फूल खायला देऊन गर्भधारणा होणार असल्याचा दावा दिला असे. बुटी वाले बाबाच्या या असामान्य दाव्यामुळे देशातील वेगवेगळ्या भागातून महिला त्यांच्या सत्रात सहभागी होत असतं. (हेही वाचा -Aghori Magic in Pune: सुनेला चारली स्मशानातील राख, हाडांची भुकटी; पुणे येथील धायरी परिसरातील घटना)
दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. दिनेश मिश्रा यांनी महासमुंद जिल्हाधिकाऱ्यांना या उपक्रमाची माहिती दिली. त्यामुळे ही बाब उघडकीस आली. प्रत्युत्तरादाखल, तहसीलदार, एसडीएम, ब्लॉक मेडिकल ऑफिसर आणि पोलिसांचा समावेश असलेले एक पथक तपासासाठी बुटीपाली येथे रवाना करण्यात आले. संघाने उपस्थितांचे जबाब नोंदवले आणि जगतबाबांच्या सत्राबाबत पुरावे गोळा केले. (हेही वाचा - अंधश्रद्धेचा कळस: कुंडली दोष नाहीसे होण्यासाठी लावले कुत्रा-कुत्रीचे लग्न, 500 लोक, निमंत्रण पत्रिका, DJ, मेजवानी, वरात असा होता थाट)
सखोल चौकशीअंती प्रशासनाने गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या ‘दरबार’च्या मेळाव्यावर बंदी घातली. जगत बाबांनी भूतबाधाद्वारे आजार बरे करण्याचा दावा देखील केला. सध्या त्यांचा दरबार बंद करण्यात आला आहे. मात्र, तरीही स्थानिक जगतबाबांवर विश्वास व्यक्त करत आहेत. (अंधश्रद्धेचा कळस! तामिळनाडूच्या मंदिरात बसवली 'कोरोना देवी'ची मूर्ती; सकाळ-संध्याकाळ होत आहे विधिवत पूजा (Watch Video))
तथापी, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. कुडेशिया यांनी या उपक्रमांचा अंधश्रद्धा म्हणून निषेध केला आणि ‘दरबार’ बंद करण्यासाठी पावले उचलली. जगत बाबाचे प्रकरण छत्तीसगडमधील एका व्यापक समस्येवर प्रकाश टाकते. या प्रकरणात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यापूर्वी मेळाव्यांबाबत माहिती असल्याचे सांगितले होते. परंतु, औपचारिक तक्रारींचा अभाव हा हस्तक्षेपास अडथळा असल्याचे त्यांनी नमूद केले.