Jammu-Kashmir Update: अवंतीपोरामध्ये सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, नागबेरनमधील त्रालच्या जंगलात झाली चकमक
Indian Army | Image Used for Representational Purpose only | (Photo Credit-PTI)

जम्मू -काश्मीरच्या (Jammu and Kashmir) अवंतीपोरामध्ये (Avantipora) सुरक्षा दलांनी (Security forces) तीन दहशतवाद्यांचा (Terrorists) खात्मा केला आहे. दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. सुरक्षा दलांना दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच, परिसराला ताबडतोब वेढा घातला गेला. घेराव केल्यानंतर सैनिकांनी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले. मात्र दहशतवाद्यांनी गोळीबार (Firing) सुरू केला. घटनास्थळी उपस्थित सुरक्षा दलांनी लगेच मोर्चा नेला आणि दहशतवाद्यांकडून सुरू असलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. चकमकीत ठार झालेले तीन दहशतवादी जैशचे कमांडर (Commander of Jaish) असल्याचे सांगितले जाते. मात्र,अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही. घटनेनंतर परिसरातील लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अवंतीपोराच्या नागबेरन त्रालच्या जंगलाच्या वरच्या भागात चकमक सुरू होती. या चकमकीत पोलीस आणि लष्कराचे जवान मिळून ऑपरेशन करत होते. शुक्रवारी देखील सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. यापूर्वी शुक्रवारी रात्री दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील एका शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्याच्या घरात घुसून त्याला ठार मारले होते. ही घटना त्राल भागातील आहे. 35 वर्षीय जावेद अहमद यांच्या लुरगाम येथे रात्री साडेनऊच्या सुमारास दहशतवाद्यांनी गोळी झाडली आणि ते पळून गेले.

याआधी शुक्रवारी हिजबुल मुजाहिदीनचे दोन दहशतवादी ठार झाले आहेत. दोन्ही दहशतवादी लोकांच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या पथकाचा भाग होते. पोलीस प्रवक्त्याने सांगितले होते की, पुलवामा जिल्ह्यातील पंपोर भागात क्रूमध्ये दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घातला आणि शोधमोहीम सुरू केली. ते म्हणाले की या ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांची उपस्थिती लक्षात येताच त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले गेले. पण त्यांनी संयुक्त शोध पक्षावर अंदाधुंद गोळीबार केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलांनीही गोळीबार केला आणि चकमक झाली. हेही वाचा IND vs ENG 2021: इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेव्यतिरिक्त भारतीय कर्णधार विराट कोहली या 'मिशन'च्या तयारी व्यस्त
या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन दहशतवादी ठार झाले असून त्यांचे मृतदेह चकमकीच्या ठिकाणाहून सापडले आहेत. त्यांची ओळख खरु येथील मुसैब अहमद भट्ट आणि चाकुरा पुलवामा येथील मुजामिल अहमद राथर अशी झाली आहे. ते म्हणाले की, पोलिसांच्या नोंदीनुसार भट्ट नागरिकांच्या छळासह अनेक दहशतवादी हल्ल्यांच्या नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये गुंतले होते. ते म्हणाले, "त्रालच्या लुरगाम भागात जाविद अहमद मलिक नावाच्या नागरिकाच्या हत्येमध्ये तो सामील होता आणि दक्षिण काश्मीरमध्ये नागरिकांच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या हिजबुल मुजाहिद्दीनच्या पथकाचा भाग होता."