Madras High Court On Dr Ambedkar Photographs: आता तामिळनाडूच्या सर्व लॉ कॉलेजमध्ये डॉ. बी.आर. आंबेडकर (Dr BR Ambedkar) यांचा फोटो दिसणार आहे. मद्रास उच्च न्यायालयाने (Madras High Court) महाविद्यालयातून निलंबित करण्यात आलेल्या विद्यार्थ्याच्या याचिकेवर सुनावणी केली. त्यानंतर न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिली. मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने शुक्रवारी आपल्या निर्देशात म्हटले आहे की, तामिळनाडूतील सर्व विधी महाविद्यालयांनी डॉ. बीआर आंबेडकर यांचे फोटो लावावेत.
महाविद्यालय प्राधिकरणाकडून अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यावर कारवाई करण्यात आली. त्यानंतर या विद्यार्थ्याने मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या प्रकरणावरील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती जीआर स्वामीनाथन यांनी राज्यातील सर्व विधी महाविद्यालयांना हा आदेश दिला. (हेही वाचा - Rape on Pretext of Marriage: दिव्यांग व्यक्तीकडून मुलीवर बलात्कार; लग्न करण्यास नकार दिल्याने मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने नाकारला आरोपीचा जामीन)
एस. शशीकुमार (S. Sasikumar) नावाच्या विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या प्राचार्याकडे डॉ. आंबेडकरांचे चित्र लावण्याची मागणी केली आणि या मुद्द्यावरून महाविद्यालय प्राधिकरणाशी संघर्ष केला. शशीकुमार हे शासकीय विधी महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेत आहेत. याशिवाय शशीकुमारने लॉ अभ्यासक्रम तामिळ भाषेत शिकवण्याची मागणी केली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
एस. शशीकुमार नावाच्या विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या प्राचार्याकडे डॉ. आंबेडकरांचे चित्र लावण्याची मागणी केली आणि या मुद्द्यावरून महाविद्यालय प्राधिकरणाशी संघर्ष केला. शशिकुमार हे शासकीय विधी महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयात आंबेडकरांच्या चित्राशिवाय हा अभ्यासक्रम तामिळ भाषेत शिकवण्याची मागणी शशीकुमार यांनी केली.
याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत तीन प्राध्यापकांची नावे दिली होती. त्यावर न्यायालयाने याचिकाकर्त्याला प्रतिवादीचे नाव देण्यास सांगितले. याचिकाकर्त्याला मुख्याध्यापकांची लेखी माफी मागण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती स्वामिनाथन यांनी वकिलाकडून अहवाल मागवला की, त्यांनी प्राचार्याच्या खोलीत डॉ. आंबेडकरांचे चित्र लावले आहे याची खात्री करावी. ज्यावर वकिलाने सांगितले की, प्राचार्यांच्या खोलीत आंबेडकरांचे चित्र आधीपासून लावलेले होते.