Uttar Pradesh Shocker: शेजारच्या महिलेला अंघोळ करताना पाहणं तरुणाचा जीवाशी बेतलं, उत्तर प्रदेशात धक्कादायक घटना
Representational Image (File Photo)

Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेश येथे धक्कादायक घटना घडली आहे. शेजारच्या महिलेला अंघोळ करताना पाहण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. महिलेला अंघोळ करताना पाहण्यासाठी   गेलेला व्यक्ती दारूच्या नशेत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, त्याला काही लोकांनी छतावरून ढकललं, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील झाशी येथे घडली आहे. (हेही वाचा- बोअरवेलच्या केबलला आग लागल्याने महिलेचा मृत्यू, अंबड येथील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, शेजारची महिला अंघोळ करण्यासाठी गेल्याची माहिती मिळताच, मद्यधुंद अवस्थेत असलेला व्यक्ती तीला पाहण्यासाठी गेला. त्यानंतर टेरेसवरून महिला पाहण्यासाठी गेल्याची माहिती शेजाऱ्यांना मिळताच, त्याला धडा शिकवण्यासाठी काही जण टेरेसवर गेले. परंतु तेथे त्याने भीतीच्या पोटाने तो टेरेसवरून खाली पडला. खाली पडल्यानंतर त्याला गंभीर जखम झाली. यात त्याचा मृत्यू झाला. ही माहिती त्याच्या कुटुंबायांना कळताच, त्यांनी गावात गोंधळ करण्यास सुरुवात केली.

या घटनेनंतर कुटुंबानी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आणि एकाला आरोपीला अटक केले आहे. मृत व्यक्ती मद्यपान करून होता अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस या प्रकरणात पुढील तपासणी करत आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.