IIT BHU Rape Case: वाराणसीच्या बीएचयूच्या आयआयटी कॅम्पसमध्ये बीटेकच्या विद्यार्थिनीवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींविरुध्दात आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणी लंका पोलिस ठाण्यात कारवाई सुरु आहे. आरोपीविरुध्दात न्यायालयात 200 हून अधिक पानांच्या आरोपपत्रात दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थिनीसोबत घडलेल्या घटनेचा तपशील तिच्याच शब्दात नमुद केला आहे. (हेही वाचा- लज्जास्पद! दिल्लीत लिव्ह इन पार्टनरच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; )
मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरच्या सुरुवातीला आयआयटी बीएचयूमध्ये एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाला होता. मित्रासोबत जाणाऱ्या तरुणीला तीन तरुणांनी अडवून तिचा विनयभंग केला आणि व्हिडिओही बनवला. या प्रकरणात तीन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले. कुणाल पांडे, सक्षम पटेल आणि अभिषेक चौहान उर्फ आनंद यांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले. प्रॉक्टोरियल बोर्डाचे सुरक्षा रक्षक आणि वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
पोलिसांनी न्यायालयात तिन्ही आरोपींच्या मोबाईलचे लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज आणि त्याचा डेटा हे पुरावे सादर केले आहे. मोबाईलसह मोटारसायकल देखील पोलिसांनी जप्त केली आहे. नोव्हेंबर मध्ये घडलेल्या या घटनेनंतर वाराणसीत एकच खळबळ उडाली होती. युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन देखील केला होता. या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी संपूर्ण कॅम्पस बंद ठेवला होता. वर्गखोल्या आणि प्रयोगशाळेतील संशोधनाचे कामही बंद झाले. संपूर्ण कॅम्पसची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. त्याचवेळी पोलिसांनी या प्रकरणी लंका पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला होता.