Hyderabad Encounter: निर्भयाच्या आईने मानले हैदराबाद पोलिसांचे आभार; पाहा काय व्यक्त केली प्रतिक्रिया
Nirbhaya's mother on Hyderabad Encounter (Photo Credits: ANI)

Nirbhaya's Mother Reacts To Hyderabad Police Encounter: हैदराबाद येथील तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यात गेल्या आठवड्यात एका 27 वर्षीय महिला वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार (Hyderabad Rape Case) करून तिचा जळलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणातील चारही आरोपींना आज हैदराबाद पोलिसांनी एन्काऊंटर (Hyderabad Police Encounter) करत ठार केले आहे. हे वृत्त समोर येताच, त्यावर दिल्लीतील निर्भया प्रकरणातील पीडितेच्या आईने आनंद व्यक्त करत एएनआईला आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हैदराबादच्या पीडितेला केवळ 10 दिवसांत न्याय मिळाला याचा आनंद झाल्याचे  निर्भयाच्या आई म्हणाल्या व एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांचे त्यांनी देखील आभार मानले.

एएनआई ला दिलेल्या मुलाखतीत निर्भयाच्या आई म्हणाल्या, “हैदराबाद पोलिसांनी आरोपींना दिलेल्या या शिक्षेमुळे मी अत्यंत खूष आहे. पोलिसांनी मोठे काम केले असून पोलिस कर्मचार्‍यांवर कोणतीही कारवाई केली जाऊ नये, अशी माझी मागणी आहे."

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचे एन्काऊंटर करणारे पोलिस सिंघम वी.सी. सज्जनार कोण आहेत; जाणून घ्या

निर्भया प्रकरणातही लवकरात लवकर न्याय व्हावा अशी त्यांनी मागणी केली. त्या म्हणाल्या की, "निर्भया प्रकरणात न्याय मिळावा म्हणून मी गेल्या 7 वर्षांपासून संघर्ष करीत आहे. या देशातील न्यायव्यवस्थेला आणि सरकारला मी आवाहन करतो की निर्भयाच्या दोषींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी."

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर

तसेच देशातील जनतेपुढे त्यांनी मागणी केली आहे की, "मी समाजाला आवाहन करु इच्छिते की ज्या मुलींवर अमानुष अत्याचार होऊनही आरोपी जिवंत आहेत, अशा आरोपींना सरकार अद्याप तुरुंगात का पाळत आहेत? असा प्रश्न प्रत्येकानं विचारायला हवा."