Hyderabad Crime News: तेलंगणाच्या हैदराबादमध्ये वीज विभागाच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना एकाने कॅमेरात कैद केल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली आहे. वीज बिल न भरल्याच्या कारणावरून त्या व्यक्तीच्या निवासस्थानाची वीज खंडित करण्यासाठी आलेल्या विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हैदराबादच्या ओल्ड सिटी परिसरात ही घटना घडली.
मोहम्मद उमर चौधरी असे आरोपीचे नाव असून तो हैद्राबाद येथील पुराणी हवेली परिसरातील रहिवासी आहे. 10,000 रुपयांचे बिल थकीत असल्याने वीज विभागाच्या कर्मचाऱ्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित केला. व्हिडिओमध्ये तो व्यक्ती कर्मचाऱ्यावर हल्ला करताना दिसत आहे आणि कर्मचारी म्हणतो की तो फक्त त्याचे कर्तव्य बजावत होता. तो माणूस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करताना दिसला आणि म्हणाला की त्याने वीज विभागाच्या कर्मचाऱ्याला वीज बिल भरण्यासाठी GPay नंबर किंवा पेमेंटच्या इतर कोणत्याही पद्धतीवर पाठवण्यास सांगितले, ज्याला कर्मचाऱ्याने उत्तर दिले नाही आणि फोन ठेवला त्यानंतर तो माणूस आला. रागाच्या भरात घराचा विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यावर हल्ला केला.
बऱ्याच वेळ वाद चालू होता दरम्यान त्याने खंजीर बाहेर काढून व्यक्तीला धमकवण्याचा प्रयत्न केला. आरोपी बाईक वरून घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती पोलिसांत देण्यात आली. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.