Crime: हुंड्यात म्हैस न मिळाल्याने पतीचा चढला पारा, रागाच्या भरात पत्नीची हत्या
Representational Image (Photo Credits: Facebook)

हुंड्यात (Dowry) कार-बाईक आणि पैशांची मागणी तुम्ही ऐकली आणि वाचली असेल. पण बिहारच्या (Bihar) पूर्व चंपारण (Champaran) जिल्ह्यातील कुंडवा चैनपूर पोलीस स्टेशन (Kundwa Chainpur Police Station) हद्दीतील खरुहा गावात हुंड्यात म्हैस न मिळाल्याने पतीच प्राणी बनला. हुंडाच्या हव्यासापोटी म्हैस न मिळाल्याने वाद एवढा वाढला की त्याने रविवारी रात्री विवाहितेचा चाकूने वार करून खून केला. कुंडवा चैनपूर येथील रहिवासी नन्हक सिंग यांची मुलगी 24 वर्षीय अमृता कुमारी असे मृत महिलेचे नाव आहे. कुंडवा चैनपूर पोलीस स्टेशन हद्दीतील खरुहा येथील रहिवासी बैद्यनाथ सिंह यांचा मुलगा दरोगा सिंग याच्याशी 2018 साली अमृताचे लग्न झाले होते.

मृत अमृताला दोन मुली आणि एक मुलगा आहे. सगळी मुलं अजून लहान आहेत.  सकाळी शेजाऱ्यांकडून माहिती घेऊन नानहक सिंग मुलीच्या सासरच्या घरी पोहोचले. तेव्हा खोलीत मुलीचा मृतदेह पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचवेळी मृताची मुले मृतदेहाजवळ बसून रडत होती. हेही वाचा Bihar: बिहारमध्ये चक्क 60 फुट लांबीचा पूल चोरीला; सूत्रधारासह दोन सरकारी अधिकारी आणि 8 आरोपींना अटक

चाकूने मानेचे व पोटावर वार करण्यात आले. घटनेनंतर आरोपी घर सोडून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच कुंडवा चैनपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. घटनेची पुष्टी करताना एसएचओ रमण कुमार यांनी सांगितले की, मृताच्या वडिलांच्या जबाबावरून एफआयआर नोंदवून आरोपींना पकडण्यासाठी छापेमारी सुरू आहे.