चंदीगड (Chandigarh) येथील राम दरबार (Ram Darbar) येथे एका 22 वर्षीय महिलेने तिच्या घरी जीवन संपवल्याच्या एका दिवसानंतर, पोलिसांनी रविवारी तिच्या पतीला आणि तिच्या सासरच्यांना आत्महत्येस (Suicide) प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक (Arrested) केली. पोलिसांनी सांगितले की, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्न झालेल्या पीडितेने तिच्या सासरच्या घरी गळफास लावून घेतला. तिच्या पतीला ती लटकलेली दिसली, त्यानंतर त्याने गजर केला आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. पीडितेला तातडीने GMCH-32 मध्ये नेण्यात आले जेथे तिला मृत घोषित करण्यात आले.
मृताच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती आणि सासरच्या मंडळींना अटक केली. फिर्यादीत म्हटले आहे की, मयताचे सासरचे लोक तिचा हुंड्यासाठी छळ करत होते. सेक्टर-31 पोलिसांनी भादंवि कलम 306 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवार आणि शनिवारी पाच पुरुषांसह एकूण सहा जणांनी जीवन संपवले. शुक्रवार आणि शनिवारी नोंदवलेल्या उर्वरित पाच प्रकरणांमध्ये पोलिसांनी चौकशीची कार्यवाही सुरू केली. हेही वाचा Bihar Shocker: कुटुंबियांची लग्नाला दिला नकार, प्रेमी युगूल पोहोचले पोलिस ठाण्यात, ठाणेदाराने लावले लग्न
दुसर्या प्रकरणात, शनिवारी मलोया येथे एका 34 वर्षीय व्यक्तीने गळफास लावून आपले जीवन संपवले. शनिवारी मणिमाजरा येथे एका 28वर्षीय तरुणाचा घरात लटकलेला मृतदेह आढळून आला. मणिमाजरा येथील मोरी गेट येथे गळफास घेऊन 38 वर्षीय तरुणासह तीन आत्महत्यांच्या घटना शुक्रवारी घडल्या. कौटुंबिक त्रासातून एका 25 वर्षीय तरुणाने मिल्क कॉलनीत टोकाचे पाऊल उचलले. दुसऱ्या एका घटनेत सेक्टर 15 येथील एका 65 वर्षीय व्यक्तीने नैराश्येपोटी राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.