Madhya Pradesh Car Accident: मध्य प्रदेशातील सातना जिल्ह्यात एक भीषण अपघात (Accident)म झाल्याची माहिती समोर येत आहे. कार उलटल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे आणि दोन जण गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात रविवारी रात्री उशिरा रात्री झाला. ही घटना मनकारी गावातील सेतना रेवा रोडवर झाली. या अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ वाहतुक सेवा ठप्प झाली होती. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. (हेही वाचा- पुणे तिथे काय उणे! वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे पडले महागात; पोलिसाने एकाला थेट लेग मसाज करायला लावला)
मिळालेल्या माहितीनुसार, कारमध्ये कार चालकासह सहा जण प्रवास करत होते. कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार पलटली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचे भरपूर नुकसान झाले. कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आणि दोन जण गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी अपघाची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले. अपघातानंतर रस्त्यावर खळबळ उडाली.
पोलिसांनी जखमी झालेल्या दोन प्रवाशांना रुग्णलयात दाखल केले. शिबू तिवारी, शिव पांडे, शानु खान आणि नितीन असे अपघातात मृत झालेल्या तरुणांची नावे आहे. सातना जिल्ह्यातील रेवा येथील रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी चौघांचे मृतदेह ताब्यात घेतले आहे. पोस्टमार्टमनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कुटुंबाच्या हवाले करणार आहे अशी माहिती पोलिसांना दिली.