Pune Police (File Photo)

Pune News:  पुणे जसे पुणेरी पाट्यांसाठी ओळखले जाते. तसेच, तिथे प्रत्येक गोष्टीत नाविन्यही आढळते. आता नुकत्याच समोर आलेल्या घटनेत एका तरूणाने वाहतूक नियमांचे (Pune Traffic Police)उल्लंघन केले. ज्याची शिक्षा त्याला पोलिस कर्मचाऱ्याचे पाय चेपावे लागले. या घटनेचा व्हिडीओ पुणेकर न्यूजने त्यांच्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. हा व्हिडिओ पुण्यातील कल्याणीनगर भागातील असल्याचा दावा करण्यात आला आहे.

कल्याणीनगरमध्ये गेल्या काही दिवसांपूरर्वी झालेल्या अपघातात दोघांना त्यांचा जीव गमावावा लागला होता. बड्या उद्योगपतीच्या मुलाने त्यांच्या पोर्शे कारने दुचाकीला धडक दिली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पुण्यात वाहतूक व्यवस्था कडक करण्यात आली आहे. शहरात ठिकठिकाणी नाकबंदी करण्यात आली आहे. ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना नियमात बसणारे दंड आकारण्याची शिक्षा सुनावली जात आहे. मात्र, या समोर आलेल्या व्हिडीओत एकजण रसत्याच्या कडेला बसलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे पाय चेपताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओची दखल घेत वाहतूक विभागाचे डीसीपी रोहिदास पवार यांनी निवेदन जारी केले. ज्यात त्यांनी म्हटले की, 'पीएसआय गोराडे, वय 57, येरवडा वाहतूक विभाग, हे ॲडलॅब्स चौक, कल्याणीनगर येथे ड्रंक एन ड्राईव्हसाठी ड्युटीवर होते. सतत रात्रीच्या वेळी 2 दिवस ड्युटीवर असल्याने त्याची शुगर 550 वर पोहोचली होती. त्यामुळे त्याच्या पाय दुखायला लागले होते.' असे डीसीपी रोहिदास पवार यांनी म्हटले.