Hyderabad Road Accident: हैद्राबाद येथील मलकम चेरूवूजवळील रायदुर्गम येथे एक भीषण अपघात झाला. हा अपघात 2ऑगस्टच्या पहाटे घडला. या अपघातात १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. भरधाव कार वेगात नंदी टेकडीवरून खाली उतरली आणि मलकम तलाव येथील उड्डाण पुलाच्या भिंतीला धडकली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली होती. हेही वाचा- कृष्णा नदी ओलांडताना ट्रॅक्टर पाण्यात पलटी, इचलकरंजी येथील घटना
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव चरण आहे. तो बीबीएचा विद्यार्थी होता. हा अपघात इतका भयंकर होता की घटनेत चरणचा मृत्यू जागीच झाला. अपघातानंतरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अपघाता स्विफ्ट डिझायर कारचा अक्षरशा चुराडा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी पोलिस दाखल झाले. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर चरणचा मृतदेह बाहेर काढण्यात आला अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
19-year-old Hyderabad college student dies after his speeding car rams into the boundary wall of a flyover.
The student was identified as Charan, a BBA student. #Hyderabad pic.twitter.com/lt6jJwyd5r
— Vani Mehrotra (@vani_mehrotra) August 2, 2024
पोलिसांनी माध्यमांना माहिती दिली की, कार भरधाव वेगात होती. त्यानंतर अनिंयत्रित होऊन त्याचा अपघात झाला. पोलिसांनी चरणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. रायदुर्गम पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद घेण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरु आहे.