Rajgarh Road Accident: pc twitter

 Rajgarh Road Accident: राजस्थान राजगड येथील बॉर्डरवर एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ट्रक उलटल्याने 13 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 15 जण जखमी झाले आहे. ट्रकमधील प्रवाशी हे राजस्थान येथे लग्न समारंभासाठी जात होते. त्यावेळीस ही घटना घडली. ही घटना रविवारी उशिरा रात्री घडली आहे. पोलिसांना या अपघाताची माहिती देताच, अपघातस्थळी पोलिस दाखल झाले. त्यांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगत आहे. (हेही वाचा-  पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात शिवानी आणि विशाल अग्रवाल दोघांना 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी)

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये लग्न सोहळ्याला जाण्यासाठी काही लोकांनी ट्रकमधून प्रवास केला, हा ट्रक अनियंत्रित होऊन राजस्थान राजगड येथे बॉर्डरवर पलटला. हा अपघात इतका भीषण होता की, १३ प्रवांशाचा जागीच मृत्यू झाला आणि १५ जण जखमी झाले. पोलिसांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले आहे. त्यानंतर त्यांना भोपाळ येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. जखमींना योग्य उपचार दिला जाईल अशी माहिती राज्याचे कलेक्टर हरिश दिक्क्षीत यांनी माध्यमांना दिली.

या अपघातानंतर कॅबिनेट सहकारी नारायण सिंग पनवार घटनास्थळी पाहणी करण्यासाठी आले आहे. त्यांच्यासह जिल्हाधिकारी आणि राजगडचे एसपी उपस्थित होते. अपघातानंतर राष्ट्रपती द्रौपती मुर्म यांनी मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आहे. जखमींवर राजगड आणि भोपाळ  येथे उपाचारासाठी पाठवले आहे. या घटनेनंतर परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.