Close
Advertisement
 
सोमवार, जानेवारी 20, 2025
ताज्या बातम्या
6 minutes ago

Himachal Pradesh: पॅराग्लायडिंगशी संबंधित वेगवेगळ्या अपघातात दोन पर्यटकांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एका १९ वर्षीय गुजराती महिलेचा मृत्यू झाला, तर २९ वर्षीय पॅराग्लायडिंग पायलट जखमी झाला. भावसार खुशबू असे या महिलेचे नाव असून ती कुटुंबासमवेत सुट्टीसाठी अहमदाबादहून धर्मशाळा येथे आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, खुशबूने इंद्रनाग साइटवर पॅराग्लायडिंगचा अनुभव घेण्याचा निर्णय घेतला.

राष्ट्रीय Shreya Varke | Jan 20, 2025 08:02 AM IST
A+
A-
Photo- X/@dilshad_akhtar1

Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एका १९ वर्षीय गुजराती महिलेचा मृत्यू झाला, तर २९ वर्षीय पॅराग्लायडिंग पायलट जखमी झाला. भावसार खुशबू असे या महिलेचे नाव असून ती कुटुंबासमवेत सुट्टीसाठी अहमदाबादहून धर्मशाळा येथे आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, खुशबूने इंद्रनाग साइटवर पॅराग्लायडिंगचा अनुभव घेण्याचा निर्णय घेतला. ती आणि पायलट उड्डाण करणार असतानाच अचानक पॅराशूटची छत्री फुटली आणि दोघेही टेकडीवरून खाली पडले. खुशबूचा जागीच मृत्यू झाला, तर वैमानिक गंभीर जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पॅराग्लायडिंग करताना पर्यटकाचा मृत्यू

पोलिसांनी याप्रकरणी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास झाला, तर पॅराग्लायडिंगला सायंकाळी पाच वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याने हा अपघात झाला का, याचा तपास केला जात आहे.

अशीच एक घटना शुक्रवारी कुल्लू येथे घडली जिथे पॅराग्लायडिंग करताना तामिळनाडूच्या एका पर्यटकाचा मृत्यू झाला. या दोन्ही अपघातात वैमानिक जखमी झाला आहे. पोलिसांनी दोन्ही प्रकरणात निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.


Show Full Article Share Now