Representational Image (File Photo)

Madhya Pradesh Roof Collapsed: मध्य प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून संततधारा पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. तवा धरण, बरगी धरण आणि भडभडा धरण यांसारख्या राज्यातील सात प्रमुख धरणांचे ५६ दरवाजे उघडण्यात आले आहे. शनिवारी पहाटे पावसाने थोडावेळ ब्रेक घेतला तेवढ्यात नरसिंगपूर जिल्ह्यात एक दुर्घटना घडली. (हेही वाचा- आदिवासी कुटुंबाला वाचवण्यासाठी वन अधिकाऱ्यांच्या धोकादायक ट्रेक, वडिलांसह मुलांना केलं रेस्क्यू (Watch Video)

मिळालेल्या माहितीनुसार, नरसिंगपूर जिल्ह्यातील एका गावात वादळी वाऱ्यासह पाऊस होता. मुसळधार पावसामुळे गावातील एक घराचे छत कोसळले. या घटनेत एका चिमुकली सह दोघांचा मृत्यू झाला आणि पाच जण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना गदरवारा तहसीलमधील रामपुरा गावात घडली. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबाला एक लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याचे आवाहन दिले आहे.

पहाटे संपुर्ण कुटुंब निद्रावस्थेत असताना घराचे छत अचानक कोसळले. या दुर्घटनेत ३ वर्षाची मुलगी आणि १७ वर्षाचा मुलगा मरण पावला. तर कुटुंबातील इतर पाच सदस्य ढिगाऱ्याखाली अडकली. घटनेची माहिती मिळताच, बचाव कार्य सुरु झाले. दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर इतर लोकांना ढिगाऱ्यांतून बाहेर काढले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

दुर्घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. माध्यमांशी बोलकाना कॅबिनेट मंत्री आणि स्थानिक आमदार राव उद्य प्रताप सिंह म्हणाले की, त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. पीडित कुटुंबाला पीएस आवास योजनेंतर्गत घर दिले जाईल अशी माहिती दिली.