Kerala Landslides: PC TW

Kerala Landslides: केरळ येथील वायनाड भुस्खलनात मृतांची संख्या 340  वर पोहोचली आहे. धक्कादायक म्हणजे सुमारे 200 लोक बेपत्ता असल्याची माहिती असल्याने अद्याप बचाव कार्य सुरु आहे. शुक्रवार पर्यत 210 मृतदेह सापडले आहे.या मोहिमेतून बचाव कार्य करत असताना, एका टीमने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गुरुवारी कलपेट्टा रेंज फॉरेस्ट ऑफिसर के हशीस यांच्या नेतृत्वाखाली एका टीमने आदिवाशी कुटुंबाची सुटका केली. (हेही वाचा- केरळमधील वायनाड येथे भूस्खलनात 6 ठार, अनेक अडकल्याची भिती)

आदिवासी कुटुंबाला वाचवण्यासाठी टीममधील जवांनानी धोकादाय ट्रेक पूर्ण केला. टीमने संपुर्ण कुटुंबाना बाहेर काढले आहे. ज्यात चार ते पाच वयोगटातील चार बालकांचा समावेश आहे. त्यांच्या या धाडसी कृत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडिओ 

पणिया समुदायातील हे कुटुंब एका डोंगरावरील एका गुहेत अडकून पडले होते. जिथे खोल दरी होती. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बचाव पथकाला साडेचार तासांचा खडतर ट्रेक पूर्ण करावा लागला. या संदर्भात टीमचे अध्यक्ष हशीस यांना माध्यमांना सांगितले की, त्यांना आई आणि तिचे मूल जंगलाजवळ सापडले होते. त्यांची चौकशी केल्यानंतर समजले की, त्यांचे पती तीन मुलांसोबह गुहेत अडकले आहे. त्यानंतर शोध कार्य सुरु झाले. साडेचार तासानंतर मुले आणि त्यांचे वडिल सापडले.

परंतु त्यानी सुरुवातीला येणास नकार दिला. त्यानंतर खूप समजावून सांगितल्यानंतर त्यांच्या वडिलांना घेऊन, बाहेर पडण्याच्या मार्ग शोधला. त्यांना बाहेर काढल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी सर्व कुटुंबाना कार्यालयात ठेवले. या घटनेची माहिती केरळचे मुख्यमंत्री यांना देण्यात आली. सोशल मीडियावर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी वन अधिकाऱ्यांच्या धाडसी कृत्यांचे कौतुक केले.