एचडीएफसी ऑनलाइन बँकिंगमध्ये बिघाड; ग्राहक त्रस्त
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

एचडीएफसी (HDFC) ऑनलाइन बॅंकिंगमध्ये सोमवारी संध्याकाळी 6.15 वाजल्यापासून बिघाड झाला आहे. यामुळे एचडीएफसी ग्राहकांना ऑनलाईन पैसाच देवाण घेवाण करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महत्वाचे म्हणजे, अजूनही ग्राहकांना ऑनलाईन पैसाची देवाण-घेवाण करता येत नाही. त्यामुळे एचडीएफचे ग्राहक संताप व्यक्त करत आहेत. ग्राहकांची होणाऱ्या गैरसोयीबदल बॅंकेने दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच लवकरात या तांत्रिक समस्याचे समाधान केले जाईल, असे अश्वासनही बॅंकेकडून देण्यात आले आहे.

एचडीएफसी बँकेचे ग्राहक बँकेच्या नेटबँकिंगमुळे त्रस्त आहेत. सोमवारी संध्याकाळी 6.15 वाजल्यापासून एचडीएफसीच्या ऑनलाईन बॅंकिंग करताना ग्राहकांना अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत. दरम्यान, ग्राहकांना नेटबॅकिंग आणि मोबाईल बॅंकिंग अॅप अॅक्सेस करता येत नाही. तसेच अनेकजण बिल भरण्यासाठी ऑनलाईन पर्याय निवडतात. परंतु, महिन्याच्या सुरुवातीला ही तांत्रिक अडचण आल्याने ग्राहकांना अन्य व्यवहार करताना अनेक अडचणी येत आहेत. एचडीएफसी बँकेने आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट करून माहिती दिली की, तांत्रिक कारणाने ही समस्या निर्माण झाली होती, आणि या बिघाडाची कल्पना आम्ही ग्राहकांना आधीच दिली होती. रात्री उशिरापर्यंत बँकेला ही सेवा सुरळीत करता आली नव्हती. हे देखील वाचा- HDFC Bank Recruitment 2019: खुशखबर! एचडीएफसी बँकेत तब्बल 5 हजार पदांची नोकर भरती; 4 लाखांपर्यंत पगार, असा करा अर्ज

एचडीएफसीचे ट्वीट-

आज दुपारी 12.30 वाजल्यापासून ग्राहकांना ऑनलाईन देवाण घेताना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यानंतर बॅंकेला कळवण्यात आले असून अजूनही ग्राहकांचा अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.