HDFC (Photo Credit: PTI)

बँक (Bank) मध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. एचडीएफसी बँक (HDFC Bank) ने युनिक रिक्रूटमेंट प्रोग्राम फ्युचर बँकर्स प्रोग्रामची (Future Bankers Program) सुरूवात केली आहे. या अंतर्गत पात्र उमेदवारांना 6 महिन्यांचे ट्रेनिंग दिले जाणार असून, पुढे 6 महिन्यांपर्यंत त्यांना बँकेत इंटर्न म्हणून घेण्यात येणार आहे. यामध्ये निवडलेल्या उमेदवारांना वार्षिक 4 लाख रुपयांपर्यंत पगार मिळण्याची शक्यता आहे. तसेच ज्या शहरात पोस्टिंग होईल त्या शहरानुसार इतर भत्तेही मिळणार आहे. बँक या कार्यक्रमांतर्गत पुढील 2-3 वर्षांत 5 हजार लोकांना नोकर भरती करणार आहे.

एचडीएफसी बँक ने या खास कार्यक्रमासाठी BFSI च्या मनिपाल ग्लोबल अकादमी सह भागीदारी केली आहे. हा 'फ्यूचर बँकर्स' पूर्ण वेळ रेसिडेंशियल कोर्स आहे, ज्यात उमेदवारांना 6 महिने ट्रेनिंग घ्यावे लागणार आहे. त्यानंतर बँक त्यांना 6 महिने इंटर्न म्हणून ठेवले जाईल. यशस्वीरित्या एक वर्ष पूर्ण केल्यावर उमेदवारांना सेल्स आणि रिलेशनशिप बँकिंगमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमाचे प्रमाणपत्र मिळणार आहे. (हेही वाचा: महाराष्ट्र राज्य शासनाच्या मेगाभरतीचा मार्ग मोकळा, 'या' विभागातील रिक्त पदांवर लवकरच होणार भरती)

असा करा अर्ज : 

  • वेबसाइट https://hdfcbank.myamcat.com/ वर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरा. फॉर्म मध्ये आपले नाव, मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी भरणे आवश्यक आहे.
  • एसेसमेंट टेस्ट साठी 550 रुपयांचा अर्ज शुल्क जमा करावा लागेल. त्यानंतर एचडीएफसी बँक ऑफिशियल एसेसमेंट पार्टनर एस्पायरिंग माइंड्स आपल्याला एक कन्फर्मेशन मेल पाठवेल.
  • एस्पायरिंग माईंड्स कडून लिंक मिळाल्यानंतर, 7 दिवसांच्या आत आपल्याला ऑनलाइन एसेसमेंट पूर्ण करणे आवश्यक आहे.

    त्यानंतर एचडीएफसी बँककडून फेस-टू-फेस इंटरव्यू घेऊन उमेदवाराची निवड केली जाईल.या फ्यूचर प्रोग्राम अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना एक वर्षासाठी 3.3 लाख रुपये (टॅक्स अतिरिक्त) फी भरणे आवश्यक आहे. ही फी मनिपाल ग्लोबल अकादमीला द्यावी लागेल. ज्या लोकांना आर्थिक समस्या आहे, त्यांना कमी दराने शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देणार आहे.