Maharashtra Mega Bharti 2019: महाराष्ट्र राज्य शासनाच्या मेगाभरतीचा मार्ग मोकळा, 'या' विभागातील रिक्त पदांवर लवकरच होणार भरती

मराठा आरक्षणाबद्दल (Maratha Reservation) कोर्टाने काही दिवसांपूर्वी निर्णय स्पष्ट केला. तसेच मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत अनुक्रमे 12-13 टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे.

Maharashtra Mega Bharti 2019: महाराष्ट्र राज्य शासनाच्या मेगाभरतीचा मार्ग मोकळा, 'या' विभागातील रिक्त पदांवर लवकरच होणार भरती
Image used for representational purpose. (Photo Credits: PTI)

मराठा आरक्षणाबद्दल (Maratha Reservation) कोर्टाने काही दिवसांपूर्वी निर्णय स्पष्ट केला. तसेच मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत अनुक्रमे 12-13 टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. तर 1 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मराठा आरक्षण सुधारणा विधेयक विधानसभेत सादर केले. या विधेयकाला एकमताने मंजूरी सुद्धा विधानसभेत मिळाली.

मराठा सुधारणा विधेयक याच्यावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे आता मेगाभरतीसाठी राजपत्र शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. तर येत्या आठवड्यात शासनाच्या विविध भागातील रिक्त पदांवर मेगाभरती केली जाणार आहे. तर जाणून घ्या कोणत्या पदांवर नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.(हेही वाचा- दोन दिवसांनतर सोने, चांदी दरामध्ये पुन्हा वाढ; जाणून घ्या कसे राहिले आजचे दर)

पुढील विभागात होणार नोकर भरती

>ग्रामविकास विभाग- 13,000 पद

>कृषी- 1585 पद

>वन संरक्षक- 1500पद

>सार्वजनिक बांधकाम- 435 पद

>जलसंधारण- 250 पद

>आरोग्य- 800 पद

> वित्त (ऑडिट)-959 पद

(महाराष्ट्र राज्य नोकरभरती : 72 हजार पदे, जाणून घ्या कोणत्या विभागात किती जागा?)

तर पहिल्या टप्प्यातील नोकरभरतीला लवकरच सुरुवात होणार आहे. तसेच 20 हजार जागांसाठी जाहीराती काढण्यात आल्या आहेत. 2018 मध्ये फडणवीस यांनी जवळजवळ 72 हजार पदांसाठी नोकर भर्ती होणार असल्याचे जाहीर केले होते.

(The above story first appeared on LatestLY on Jul 04, 2019 08:44 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).