विनाचालक धावणारी दिल्ली मेट्रो पाहिली आहे का? जाणून घ्या याबदलची सविस्तर माहिती
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-PTI)

गेल्या काही वर्षापासून तंत्रज्ञान हे अधिक वेगाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी इलेक्ट्रॉनिक बस धावतानाचे व्हिडिओ व्हायरल होत होते. मात्र, आता चालक नसतानाही मेट्रो ट्रेन धावणार असल्याची माहिती दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली येथील मेट्रो ट्रेन २०२० पर्यंत डाईव्हर लेस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच या मेट्रो कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोलच्यासारख्या तंत्रज्ञानावर चालणार आहे. याआधी हे तंत्रज्ञानाचा प्रयोग जुन्या मेट्रोवर करुन पाहिले गेले आहे.

तंत्रज्ञानाचे फायदे

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृतानुसार, सीबीटीसी तंत्रज्ञानाचे अधिक फायदे आहेत. महत्वाचे म्हणजे, धावताना दोन मेट्रोत असलेले अंतर कमी होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. त्याचबरोबर अधिक सुरक्षित असणार आहे. डीएमआरसीच्या आधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता ड्राईव्हरचा स्थानावर रोमिंग (ROAMING ATTENDANTS)यासारखी सुविधा देण्यात येणार आहे. तसेच ही मेट्रो प्रवाशांना होणाऱ्या समस्येचे समाधानही करणार आहे. एवढेच नव्हे तर, अपातकालीन स्थितीला सामोरे जाण्याची क्षमता या ट्रेनमध्ये आहे. परंतु लोकांनीही या तंत्रज्ञानावर विश्वास दर्शवला पाहिजे, असे डीएमआरसीचे आधिकारी म्हणाले. (हेही वाचा, खुशखबर! आता नाशिक मध्ये धावणार विना रुळांची हायब्रीड मेट्रो, लवकरच सुरु होणार काम; मुख्यमंत्र्यांची घोषणा)