MLA Rakesh Daultabad Dies: गुरुग्रामच्या बादशाहपूर विधानसभेचे अपक्ष आमदार राकेश दौलताबाद (MLA Rakesh Daultabad) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झाले. सकाळी दहाच्या सुमारास त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना पालम विहार येथील कोलंबिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. राकेश दौलताबाद यांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांच्या समर्थकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे समर्थक रुग्णालयात पोहोचले आहेत. त्याचवेळी जेजेपी लोकसभा उमेदवार राहुल फाजिलपुरिया आणि भाजप नेते मुकेश पहेलवानही रुग्णालयात पोहोचले आहेत.
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते बादशाहपूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला. दौलताबाद यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर पोस्ट केली की, 'हरियाणाचे आमदार राकेश दौलताबाद जी यांच्या आकस्मिक निधनाने अत्यंत दु:ख झाले आहे. आपल्या मेहनतीने आणि झोकून देऊन त्यांनी लहान वयातच लोकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणाची मोठी हानी झाली आहे. या दुःखाच्या प्रसंगी ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना आणि समर्थकांना शक्ती देवो. ओम शांती!' (हेही वाचा - Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकच्या सहाव्या टप्प्याला सुरुवात, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीटद्वारे केलं मतदारांना आवाहन)
हरियाणा के विधायक राकेश दौलताबाद जी के आकस्मिक निधन से अत्यंत दुख हुआ है। अपनी मेहनत और लगन से उन्होंने बहुत ही कम उम्र में लोगों के बीच एक अलग पहचान बनाई थी। उनका जाना प्रदेश की राजनीति के लिए एक बड़ा नुकसान है। ईश्वर शोक की इस घड़ी में उनके परिजनों और समर्थकों को संबल प्रदान…
— Narendra Modi (@narendramodi) May 25, 2024
बादशाहपुर के विधायक और विधानसभा में प्रमुख सहयोगी रहे राकेश दौलताबाद जी के आकस्मिक निधन से आहत और स्तब्ध हूं।राकेश जी के अचानक चले जाने से हरियाणा की राजनीति में एक शून्यता आई है।
ईश्वर उन्हें अपने श्री चरणों में स्थान दें।परिवारजनों और समर्थकों को दु:ख सहन करने की शक्ति प्रदान… pic.twitter.com/hDZwH2Jtjv
— Nayab Saini (मोदी का परिवार) (@NayabSainiBJP) May 25, 2024
राकेश दौलताबाद यांच्या अकाली निधनाबद्दल मुख्यमंत्री नायब सैनी यांनीही शोक व्यक्त केला आहे. दौलताबाद यांना श्रद्धांजली वाहताना, सीएम सैनी यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'बादशाहपूरचे आमदार आणि विधानसभेतील प्रमुख सहयोगी राकेश दौलताबाद जी यांच्या आकस्मिक निधनाने मी दुखावलो असून मला धक्का बसला आहे. राकेशजींच्या आकस्मिक निधनामुळे हरियाणाच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. देव त्यांना आपल्या चरणी स्थान देवो. कुटुंबीयांना आणि समर्थकांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. ओम शांती.'