Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकच्या सहाव्या टप्प्याला सुरुवात, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीटद्वारे केलं मतदारांना आवाहन
आज लोकसभा निवडणुक 2024 च्या सहावा आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान सुरु झालं आहे. शनिवारी सात वाजल्यापासून नागरिकांनी ठिकठिकाणी हजरे लावली आहे
Loksabha Election 2024: आज लोकसभा निवडणुक 2024 च्या सहावा आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान सुरु झालं आहे. शनिवारी सात वाजल्यापासून नागरिकांनी ठिकठिकाणी हजरे लावली आहे. सहाव्या टप्प्यात 8 राज्यातील 58 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदानाचा हक्क बजावण्याचा आवाहन केले आहे. (हेही वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांनी बजावला मतदानाचा हक्क
X च्या अधिकृत अकांउटवरून पंतप्रधान यांनी पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, "मी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या 6 व्या टप्प्यात मतदान करणाऱ्या सर्वांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन करतो. प्रत्येक मत महत्वपूर्ण असते. तुमचेही मत महत्त्वपुर्ण आहे! तेव्हाच लोकशाहीची भरभराट होते. आणि मी विशेषत: महिला मतदारांना आणि तरुण मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन करतो. आपल्या मताधिकाराचा जरूर वापर करा.
लोकसभा चुनाव के छठे चरण के सभी मतदाताओं से मेरा निवेदन है कि वे अधिक से अधिक संख्या में मतदान के लिए आगे आएं। एक-एक वोट मायने रखता है और आपका वोट भी उतना ही महत्वपूर्ण है! लोकतंत्र तभी फलता-फूलता है और जीवंत दिखता है, जब चुनाव प्रक्रिया में जनता-जनार्दन की बढ़-चढ़कर भागीदारी होती…
— Narendra Modi (@narendramodi) May 25, 2024
या आठ राज्यात होणार मतदान
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात बिहारमध्ये आठ, हरियाणातील सर्व १० जागा, जम्मू - काश्मीरमधील एक, झारखंडमधील चार, दिल्लीतील सात, ओडिशातील सहा, उत्तर प्रदेशातील १४ आणि पश्चिम बंगालमधील आठ जागांचा समावेश आहे. सहाव्या टप्प्यात ओडिशातील ४२ विधानसभा मतदारसंघासाठीही मतदान होत आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 25, 2024 08:52 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

