भगवान हनुमान (फोटो सौजन्य- फेसबुक)

रामाचा भक्त म्हणून ओळख असणाऱ्या भगवान हनुमानासाठी विविध प्रकारची विधाने राजकरण करणाऱ्यांकडून केली जात आहे. तर उत्तर प्रदेशचे (Utter Pradesh) क्रीडामंत्री आणि माजी क्रिकेटपटू चेतन चौहान (Chetan Chauhan) यांनी अकलेचे तारे तोडत भगवान हनुमान हे स्पोर्टस्मन असल्याचे वादग्रस्त विधान केले आहे.

भाजप (BJP) पक्षातील नेत्यांनी भगवान हनुमान यांना दलित, चिनी, जाट, मुस्लिम आणि ब्राम्हण अशा विविध जातींमध्ये त्यांचे नाव जोडले गेले. मात्र चौहान यांनी तर भगवान हनुमान (Lord Hanuman) स्पोर्टस्मन असल्याचे म्हटले आहे. तसेच देवाला कोणाता ही जात आणि धर्म नसून ते फक्त शक्तीचे प्रतीक मानले जातात. या वादग्रस्त विधानावर न थांबता त्यांनी पुढे असे म्हटले की, भगवान हनुमान हे कुस्ती सुद्धा खेळायचे.

चेतन चौहान हे स्वत: उत्तम खेळाडू आहेत. तर प्रत्येक खेळाडू हा स्पोर्टस्मन शक्ती असणाऱ्या देव देवतांची पूजा करतो. त्यामुळेच शक्तीचे प्रतीक असणारे भगवान हनुमान हे कुस्ती खेळत असल्याने कुस्तीपटू त्यांची पूजा करतात असे ही चौहान यांनी म्हटले आहे.