Abdul Malik (Photo Credit - X/@shinenewshyd)

Haldwani Violence Mastermind Arrested: दिल्लीतून मोठी बातमी समोर येत आहे. उत्तराखंडमधील हल्दवानी हिंसाचाराचा सूत्रधार (Haldwani Violence Mastermind) अब्दुल मलिक (Abdul Malik) याला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. पोलीस बऱ्याच दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. हल्दवानी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल मलिकला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. बनभूलपुरा भागात बेकायदेशीरपणे बांधलेला मदरसा पाडल्यामुळे हल्द्वानीमध्ये हिंसाचार झाला होता. स्थानिक रहिवाशांनी या कारवाईला विरोध केला. ज्यामुळे दगडफेक, जाळपोळ आणि हिंसक संघर्ष झाला.

हल्दवानी हिंसाचारात 6 जणांचा मृत्यू -

हल्दवानी येथे झालेल्या हिंसाचारात एकूण 6 जणांचा मृत्यू झाला, तर 60 हून अधिक लोक जखमी झाले. हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार असलेल्या अब्दुल मलिकचा पोलिस शोध घेत होते. अब्दुल मलिक यांने या जमिनींवर बेकायदेशीरपणे कब्जा करून त्यांची बेकायदेशीरपणे विक्री केल्याचा आरोप आहे. अब्दुल मलिक या जागेवर बेकायदेशीर मदरसा बांधला होता आणि तो पाडण्यास तीव्र विरोध केला होता. त्यांच्या पत्नीनेही महापालिकेने बांधकाम पाडण्याच्या नोटिशीला आव्हान देत न्यायालयात धाव घेतली होती. मलिक आणि त्यांचा मुलगा अब्दुल मोईद यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. (हेही वाचा -Uttarakhand Violence: उत्तराखंड हिंसाचारात 4 ठार, 250 जखमी; संचारबंदी लागू, शाळा बंद)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

8 फेब्रुवारी रोजी मदरशावर झालेल्या कारवाईनंतर बनभूलपुरा येथे हिंसाचार उसळला होता. त्या दिवशी स्थानिकांनी महापालिका कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक आणि पेट्रोल बॉम्ब फेकले. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना पोलिस ठाण्यात आश्रय घ्यावा लागला. त्यानंतर जमावाने पोलीस ठाणे पेटवून दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हिंसाचारात सहा दंगलखोर ठार झाले. तसेच पोलिस आणि मीडिया कर्मचाऱ्यांसह 100 हून अधिक लोक जखमी झाले. यानंतर बनभुलपुरा हिंसाचारामुळे संचारबंदीही लागू करण्यात आली होती.