Crime: गुडगावमध्ये थप्पड मारल्याचा बदला म्हणून घरमालकाची हत्या, 20 वर्षीय तरुण अटकेत
Murder | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

गुडगावमध्ये (Gurgaon) एका 20 वर्षीय व्यक्तीला शुक्रवारी त्याच्या माजी घरमालकाने थप्पड मारल्याचा बदला म्हणून खून (Murder) केल्याच्या आरोपाखाली अटक (Arrested) करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिलासपूर (Bilaspur) खुर्द येथील रहिवासी असलेल्या दीपकची गुरुवारी त्याच्या घराजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या पीडितेचा चुलत भाऊ संदीप याने पोलिस तक्रारीत म्हटले आहे की, संध्याकाळी 7.15 च्या सुमारास दीपक त्याच्याशी त्याच्या घराजवळ बोलला. त्याच्या कारकडे चालला होता. तेव्हा मोटारसायकलवरून आलेल्या आरोपीने त्याच्यावर अनेक राऊंड गोळीबार करत पळ काढला.

दीपकला बंदुकीच्या गोळ्या लागल्या आणि तो खाली पडला. आरडाओरडा ऐकून नातेवाईक आणि शेजारी बाहेर आले. त्यांना रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. काही लोकांनी आरोपीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, असे संदीपने तक्रारीत म्हटले आहे. गुरुवारी रात्री उशिरा बिलासपूर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 302 (हत्या) आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित कलमांनुसार आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला. हेही वाचा Battery Explosion: आदल्या दिवशी घेतलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या बॅटरीचा स्फोट; कुटुंबातील एकाचा मृत्यू, तर 3 जण जखमी

गुडगाव पोलिसांचे प्रवक्ते सुभाष बोकेन म्हणाले, आरोपी कैलाशने काही महिन्यांपूर्वी दीपककडून एक खोली भाड्याने घेतली होती. त्यावेळी त्यांच्यात वादावादी झाली आणि त्यादरम्यान दीपकने त्याला थप्पड मारल्याचा आरोप झाला. म्हणून, त्याने बदला घेण्याची शपथ घेतली आणि त्याला गोळ्या घालून ठार मारले. पोलिसांनी सांगितले की, तपासात असे आढळून आले आहे की आरोपीचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे.

रोहतकमध्ये त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल, मोटारसायकल, सात रिकामे शेल आणि दोन जिवंत राऊंड जप्त करण्यात आले आहेत. आरोपीला शुक्रवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, बोकेन पुढे म्हणाले.