Shocking! गुजरातच्या जांभूघोदा पोलीस ठाण्यात 2 भूतांविरुद्ध तक्रार दाखल, नेमके प्रकरण काय? घ्या जाणून

बहुतेक लोक भुतांच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत नाहीत, परंतु भुतांशी संबंधित अनेक धक्कादायक घटना देशाच्या बर्‍याच भागांतून समोर आल्या आहेत. याचदरम्यान, गुजरातमधील पंचमहाल येथे असलेल्या जांभूघोदा पोलिस ठाण्यात एका व्यक्तीने चक्क भूतांविरोधात तक्रार दाखल केली आहे. आश्चर्यकारक म्हणजे, पोलिसांनीही त्या व्यक्तीची तक्रार दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. भूतांच्या टोळीमधील 2 जणांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे, असे संबंधित व्यक्तीने तक्रारीत नमूद केले आहे.

भूतांकडून धमकी मिळल्यानंतर त्या व्यक्तीने जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महत्वाचे म्हणजे, संबंधित व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे पोलिसांना संशय आहे. फिर्यादी व्यक्ती शेतात काम करत असताना भूतांची एक टोळी त्याच्याजवळ आली आणि त्यातील दोन जणांनी त्याला जिवे मारण्याची धमकी दिली, असे त्या व्यक्तीने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी त्याची तक्रार नोंदवून घेतली असून पुढील प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. हे देखील वाचा- Hyderabad Crime: पत्नीची हत्या करून डेल्टा प्लसमुळे मृत्यू झाल्याचे नातेवाईकांना सांगितले, हैदराबाद येथील धक्कादायक घटना

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांचे म्हणणे आहे की, जेव्हा तो व्यक्ती पोलीस ठाण्यात आला तेव्हा तो खूपच घाबरलेल्या आणि अस्वस्थ दिसला. परंतु, तो मनोरुग्ण असल्याचे पोलिसांना दिसले. आम्ही त्याचा अर्ज घेतला आणि त्याला शांत करण्यास मदत केली. यानंतर पोलिसांनी पीडित मुलीच्या कुटूंबाशी संपर्क साधला असता, तो व्यक्ती मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचे उघडकीस आले असून, त्याचे उपचार सुरू आहेत, परंतु गेल्या 10 दिवसांपासून त्याने त्याचे औषध घेतलेले नाही.