Hyderabad Crime: पत्नीची हत्या करून डेल्टा प्लसमुळे मृत्यू झाल्याचे नातेवाईकांना सांगितले, हैदराबाद येथील धक्कादायक घटना
Representational Image | (Photo Credits: PTI)

आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) तिरुपतीमध्ये (Tirupati) एका सुटकेसमध्ये महिलेच्या शरीराचे तुकडे आढळल्याने एकच खळबळ माजली होती. पोलिसांनी मृत महिलेची ओळख पटवली आहे. भुवनेश्वरी असे त्या महिलेचे नाव असून ती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे. ती हैदराबाद येथील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये कार्यरत होती. भुवनेश्वरी गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता होती. भुवनेश्वरीचा पती श्रीकांत रेड्डी यानेच तिची हत्या केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, भुवनेश्वरी आणि श्रीकांत तिरुपतीमध्ये आपल्या 18 महिन्यांच्या मुलीसह राहत होते. कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे भुवनेश्वरी घरातूनच काम करत होती. श्रीकांत रेड्डी यांनी अभियांत्रिकीचा अभ्यास केला आहे आणि भ्रष्टाचार निर्मूलनाशी संबंधित ऑनलाइन संस्थेशी संबंधित आहेत. परंतु, कोरोना महामारीमुळे त्याची नोकरी गेली होती. त्यानंतर श्रीकांत खूप दारू प्यायला लागला होता. ज्यामुळे त्यांच्यात सतत वाद होत असे. हे देखील वाचा- Hyderabad Road Accident Video: भरघाव वेगाने निघालेल्या ऑडी कारची रिक्षाला जोरदार धडक, एकाचा मृत्यू; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ

दरम्यान, 22-23 जूनच्या मध्यरात्री या दोघांत पुन्हा भांडण झाले. त्यावेळी रागाच्या भरात श्रीकांतने भुवनेश्वरीची हत्या केली. त्यानंतर टॅक्सी भाड्याने घेऊन भुवनेश्वरीचा मृतदेह एसव्हीआरआर शासकीय रुग्णालयाच्या कंपाऊंडमध्ये टाकला. श्रीकांत दुसऱ्या दिवशी पुन्हा घटनास्थळी परत आला आणि सूटकेसवर पेट्रोल टाकून पेटवून दिले.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांतने आपल्या कुटुंबियांना आणि सासरच्या लोकांशी खोटे बोलले की, त्यांच्या पत्नीला कोविड-19 मधील डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झाली होती. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला असून रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्याचे त्याने त्यांना सांगितले होते.